गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर)  | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

|| सर्वसामान्य जनतेचा कैवारी अशी असे ख्याती , दख्खनच्या राजांचा आशिर्वाद सदैव राही पाठी || 
|| शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, सहकाराची  पंढरी वारणाखोऱ्यात साकारलीत ||

सर्व सामान्य माणसांच्या समृद्ध विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून अहोरात्र झटत असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. विनयरावजी विलासराव कोरे अर्थातच आदरणीय सावकर साहेब प्रत्येक विषयातील लहानसहान गोष्टींचा सखोल अभ्यास करणारे व दूर दृष्टीकोन जोपासणारे असे प्रतिभावंत राजकारणी तसेच विधायक, शाश्वत व रचनात्मक विकास कामांमध्ये रमणारे, संस्कृती संवर्धनासाठी सदैव जागृत असणारे विनयशील व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सावकर साहेब. राजकारणाबरोबरच समाज कारणांमध्ये आपले मोलाचे योगदान देणारे, वारणेच्या सहकार समूहामध्ये सूर्जन प्रकल्पातून नवीन तंत्रज्ञानाचा वेध घेणारे प्रगतशील व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सावकर साहेब. 

सावकर साहेबांचा जन्म ४ ऑक्टोबर १९७१ साली झाला. अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांचे बालपण गेले परंतु या बालपणामध्ये सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या सहकाराच्या विचाराचं आणि थोर विचारवंत स्वर्गीय विलासरावजी कोरे यांच्या संस्काराचं बाळकडू त्यांना लाभलं. 

गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर)  | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar) https://www.mediapowerlive.com/
वारणा विभाग शिक्षण मंडळातून त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या आजोबा आणि वडिलांप्रमाणे संपूर्ण आयुष्य सहकार चळवळीसाठी वाहून घेण्याचे ठरविले, सहकार चळवळीला पाठिंबा देण्याकरिता त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 

वयाच्या २८ व्या वर्षी १९९९ साली आमदारकीची पहिली निवडणूक लढविली ह्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश प्राप्त झाले. विकासकामांना प्रारंभ झाला, राजकारणामध्ये स्वतः च्या भूमिकांवरती ठाम राहणारी अशी फार दुर्मिळ माणसं असतात सावरकर साहेब त्यांपैकीच एक आहेत. म्हणूनच जनसामान्यांचा आवाज आणि त्यांच्या एकीतून निर्माण होणारी शक्ती काय करू शकते हे दाखवून देण्यासाठी २००४ साली जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. २००४ सालच्या विधानसभा निवडणूंकासाठी पक्षाच चिन्ह होतं नारळ. एका नव्या राजकीय पर्वामध्ये पहिल्याच निवडणूकीमध्ये पक्षाचे चार उमेदवार निवडून आले आणि सावकर साहेब अपारंपरिक ऊर्जा स्रोत व फलोत्पादन मंत्री झाले. 

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वांवर विविध धरणांवर श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती तर्फे अनेक जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित  करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून उर्वरित महाराष्ट्रातील पाच  बंद  साखर कारखाने वारणेच्या माध्यमातून पूर्ववत करून स्थानिक प्रगतीला चालना देण्यात आली.  देशातील पहिला सहकारी तत्वांवरील सर्वात मोठा ४४ मेगावॅट कोजनरेशन प्रकल्प वारणानगर येथे कार्यान्वित करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील दक्षिण विभागाच्या विकासाला गती देणाऱ्या शासकीय धामणी प्रकल्पाला विशेष मंजूरी व उभारणी केली. आमदारकीच्या व मंञीपदाच्या कारकिर्दीत शासनामार्फत अनेक सौरऊर्जा प्रकल्प दुर्गम व डोंगरी भागात सुरू केले. दरम्यान २००९ साली सावकर साहेब पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. 

गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर)  | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar) https://www.mediapowerlive.com/

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये माजी राष्ट्रपती महामयी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कडून ग्रामीण विकासाबद्दल कौतुक करण्यात आले. देशी खेळाला प्रोत्साहन देण्याकरिता वारणाखोऱ्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुस्तींचे  मैदान २ लाखांहून अधिक कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीत आयोजित केल्या जातात. पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा ही वृत्ती सावकर साहेब नेहमीच जोपासतात म्हणूनच, विनय कोरे स्पर्धा परीक्षा सेंटरची स्थापना त्यांनी केली. सेंटर काढण्यामागचा हेतू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता उत्तम मार्गदर्शन मिळावे. कौतुकास्पद बाब म्हणजे आज वारणाखोऱ्यातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी ह्या संधीचा लाभ घेऊन अधिकारी म्हणून रुजू झालेले आपणास पहावयास मिळतात. 

सुराज्य फौंडेशनच्या माध्यमातून प्रतिवर्षी युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अनंत अनुचित ध्येयशक्ती या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवणारे काम सुद्धा होत आहे. 

अशा प्रकारे सावकर साहेबांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रिडा, साहित्य या सर्वच क्षेञांमध्ये अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या याच सर्व कार्यकर्तृत्वाची दखल म्हणून डॉ. डि. वाय. पाटील विद्यापीठ पुणे यांचे कडून डि. लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना फाय फौंडेशन, बेस्ट ट्रॉफी ऑफ एक्ससिलन्स, सहकारश्री, नेताजी युवा, आर्यभूषण, समाजवैभव, सहकाररत्न अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. 

'अशा ह्या सहकार चळवळीतील उतुंग भरारी घेऊन क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या कामगिरीला मन:पूर्वक सलाम'.

धन्यवाद ..!



 Promoted Content : 

🔴  कृषि दिनानिमित्त आ.डॉ. विनय कोरे (सावकर) यांची खास मुलाखत.

🔴  श्री तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना लि. वारणानगर सन 2021-22 ची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.

🔴  SAHAKAR MAHARSHI LATE SHRI V.A. ALIAS ​​TATYASAHEB KORE वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे.

🔴  Sahakar Maharshi Late Shri V.A. Alias ​​Tatyasaheb Kore

🔴 पर्यटनातून जिल्ह्याचा विकास होण्यासाठी वाढीव निधीची तरतूद करणार : पालकमंत्री दिपक केसरकर Guardian Minister of Kolhapur Deepak Kesarkar

Post a Comment

0 Comments