यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातीYashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय हिंदी अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यंग साहित्यकार रमेश जोशी. सोबत संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, समारंभ अध्यक्षा डॉ. बीना शर्मा, डॉ. सुषमादेवी, डॉ.विवेक मणी त्रिपाठी.

वारणानगर/ प्रतिनिधी :  

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशना देशातील ७७० हून अधिक आणि परदेशातील प्रतिनिधींनीसह हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग नोंदविला. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, हिंदी विभाग,भारत सरकार उच्च शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने कार्यरत असणाऱ्या केंद्रीय हिंदी संस्था आग्रा, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "वर्तमान हिंदी साहित्य : वैचारिक स्थिती", या विषयावर अधिवेशन संपन्न संपन्न झाले. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे -सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम होत्या. अधिवेशनाचे संयोजन शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे समन्वयक, संशोधक मार्गदर्शक, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले.

अमेरिका स्थित 'विश्वा', आंतरराष्ट्रीय मासिकाचे संपादक प्रसिद्ध व्यंग्य लेखक रमेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानच्या अध्यक्षा, लेखिका, संशोधक डॉ. बीना शर्मा अध्यक्षस्थानी होत्या. चीन येथील विदेशी भाषा विद्यापीठातील प्रा. संशोधक, अभ्यासक डॉ. विवेकमणी त्रिपाठी, जपान येथील 'गूंज', मासिकाच्या संपादिका आणि भारत- जपान सांस्कृतिक कार्य समन्वयाच्या अध्यक्षा श्रीमती रमा शर्मा, कोल्हापूर-शिवाजी विद्यापीठाचे पूर्व अध्यक्ष आणि हिंदीतील वरिष्ठ साहित्यकार, समीक्षक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण, अंदमान- पोर्ट ब्लेअर येथून प्रा. डॉ. एन. लक्ष्मी, केंद्रीय हिंदी संस्था केंद्र, हैदराबाद येथील विभागीय अध्यक्ष डॉ. गंगाधर वानोडे, डॉ. सुषमादेवी, प्रसिद्ध अस्त्रोलॉजिस्ट अमेरिका स्थित अनिता कपूर , आभा राम, प्रा . राजलक्ष्मी कृष्णन, यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज विद्वानांनी सहभाग नोंदविला. प्रोफेसर संध्यासिंह- सिंगापूर, भारतेंदु  विमल-बीबीसी लंडन, मास्को रशिया येथील भारतीय संस्कृती कार्य विभागाचे प्रतिनिधी प्रा. सुशील कुमार आझाद, स्वीडन येथील प्रवासी भारतीय साहित्यकार सुरेश पांडेय, विश्व हिंदी संघटन कॅनडा, सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय पत्रिका, आंतरराष्ट्रीय हिंदी है मंच, या मान्यवर हिंदी भाषा, साहित्य, संस्कृती, सेवी व्यक्ती आणि संस्थांच्या शुभेच्छा ही या निमित्ताने अधिवेशनाला प्राप्त झाल्या.

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)
समारंभाच्या अध्यक्षा केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा च्या अध्यक्ष डॉ. बीना शर्मा व सहभागी मान्यवर.

प्रसिद्ध लेखिका, संपादिका डॉ. सुषमादेवी- हैदराबाद यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत प्रास्ताविकात संयोजक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की," भारतीय संस्कृती साहित्य आणि संत परंपरेतून अनेक समृद्ध विचारधारा जन्माला आल्या परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात साहित्यिकारांच्या विचारधारेमध्ये अमुलाग्र परिवर्तन झाले. कोणी एका निश्चित विचारधारेने चालणे बंद झाले. साहित्य आणि संस्कृती यांचे दूध साखरेसारखे नाते असून युवा पिढीतील साहित्यिकांनी समाज हिताच्या विचारधारेला प्राधान्य दिले पाहिजे", असे ते म्हणाले. 

प्रमुख पाहुणे अमेरिका येथील "विश्वा", मासिकाचे संपादक प्राचार्य, व्यंग लेखक रमेश जोशी म्हणाले की,"साहित्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि धार्मिक, सत्य मांडताना फार कमी साहित्यकार दिसतात. आज अनेक देशात प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जात आहे . आपल्याच देशात संस्कृती वरती विचारधारेवरती हल्ले होत आहेत. ही गंभीर बाब असून विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासण्यासाठी सांगणाऱ्या गोविंद पानसरे सारख्या महान व्यक्तीची हत्या हा चिंतेचा विषय आहे . भारतीय संस्कृती हीच एक मोठी विचारधारा असल्याचे सांगून नव्या पिढीतील लेखक आणि पत्रकारांनी भारतीय संस्कृती संवर्धनाचा विचार जोपासणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

 चीन येथील क्वान्गतोंग विदेशी भाषा विद्यापीठातील प्रा.डॉ. विवेकमणी त्रिपाठी म्हणाले की,'चीनमध्ये भारतीय प्राचीन संस्कृती आणि साहित्याचा अभ्यास केला जात आहे." पोर्ट ब्लेअर येथून बोलताना प्रा.डॉ. एन. लक्ष्मी म्हणाल्या की, हिंदी साहित्यातील विचारधारेवरती अधिवेशनाचे आयोजन करून साहित्यिकारांना, भाषा अभ्यासक, संशोधकांना आणि पत्रकारांना एकत्र घेऊन जाण्याची एक नवीन विचारधारा डॉ. प्रकाश चिकुर्डेकर आणि वारणा परिवाराने दिली आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख आणि वरिष्ठ समीक्षक, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण म्हणाले की,"रामायण - महाभारत या भारतीय महाकाव्यातून साहित्य, संस्कृती, समाज जीवनाला एक निश्चित विचारधारा मिळाली. आधुनिक हिंदी साहित्य मध्ये प्रेमचंद यांचे साहित्य जगण्याची प्रेरणा देणारे आणि गांधीवाद, यथार्थवाद आणि अतियथार्थवादी विचारधारा पद्धतीने बदलताना दिसते. वर्तमान हिंदी साहित्यातील लेखक विचारधारेपेक्षा सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक लिहीत असल्याचे ते म्हणाले.

समारंभाच्या अध्यक्ष आणि केंद्रीय हिंदी संस्थान आग्रहाच्या निदेशक प्रोफेसर बीना शर्मा म्हणाला की,"भारतीय संस्कृती, साहित्य आणि विचारधारेची नव्या पद्धतीने मांडणी करून जगाला सांगण्याची गरज आहे. प्राचीन आणि वर्तमान साहित्यातील परस्पर समन्वय ठेवणे आवश्यक असून पारंपारिक विचारधारा संस्कृती संवर्धनासाठी  उपयोगाची आहे. मांडणी मात्र नव्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचा विचार नव्या पिढीला साहित्याच्या माध्यमातून शिकवा", असा संदेश ही त्यांनी यावेळी दिला. शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ . सुनील बनसोडे यांनी उपस्थित मान्यवरांना धन्यवाद देऊन आभार मानले. तांत्रिक आणि सांस्कृतिक सहाय्य 'नॅक' समन्वयक प्रा. डॉ.एस.एस. खोत, प्रा .संतोष जांभळे, प्रा. डॉ. प्रीती शिंदे पाटील यांनी केले. अधिवेशनाचा शुभारंभ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वप्नाली चौगुले आणि वैष्णवी मदने यांनी गायलेल्या ईशस्तवन गीताने  तर समारोप नाझिया मुल्ला  हिने गायलेल्या वंदे मातरम गीताने झाला. 


 Promoted content :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित. 

🔴 वारणा महाविद्यालयातील राधिका कळंत्रे हिला राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न.

Post a Comment

1 Comments

  1. Bahut hi Achha Samaroh Hua,Preranadayi,Aayojako ka Aabhar

    ReplyDelete