यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित... Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM) Alumni Meet

Yashwantrao chavan warana mahavidyalaya_YCWM_ALUMNI MEET 2023
 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित... 

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar Alumni Meet 


वारणानगर/ प्रतिनिधी :

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा गुरुवार दि. १२ रोजी दुपारी ३ वाजता विनय कोरे क्रीडा आणि सांस्कृतिक विकास  केंद्र, वारणानगर मध्ये आयोजित  करण्यात आला आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे या समारंभास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पुणे पिंपरी चिंचवड येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, योग गुरु आणि निवृत्त पोलीस प्रमुख श्री कृष्णदेव गिरी, पुणे येथील पोलीस उपाधीक्षक क्रांतीकुमार पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत पाटील इत्यादी मान्यवरांच्या बरोबरच महाविद्यालयाच्या ५८ वर्षाच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणारे अनेक उच्चपदस्थ मान्यवर स्नेह मेळाव्याला उपस्थित राहून महाविद्यालयाच्या विकास प्रक्रियेत योगदान देणार आहेत. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष उद्योजक सुनील जाधव (तळसंदे, सध्या- पुणे), ग्रंथ मित्र आणि महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, सचिव-  डॉ.के.जी. जाधव, डॉ.एन.ए. पाटील, 'नॅक', समन्वयक डॉ. एस.एस. खोत यांच्या प्रमुख संयोजनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा संकलित करण्याचे कामकाज ही सुरू झाले असून त्याच्यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत.

शिवाय "यशवंतराव चव्हाण वारणा ॲल्युमिनी असोसिएशन", नावाने टेलिग्राम लिंक ही बनविण्यात आली असून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हावे आणि मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक :- 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfhEvye2aI0QXPnfLVVpxgelgDz7ECYITVjgJpuTM_gB5b_IA/viewform

तर टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ची लिंक :  https://t.me/+wnrciVv226c4Y2M1





 Promoted content :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न...

🔴 कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy

🔴  कृषि दिनानिमित्त आ.डॉ. विनय कोरे (सावकर) यांची खास मुलाखत.

🔴  SAHAKAR MAHARSHI LATE SHRI V.A. ALIAS ​​TATYASAHEB KORE वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे.

🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे |Biography| of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

Post a Comment

0 Comments