S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

कोडोली-काखे रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात आशीर्वाद तरुण मंडळाचा पुढाकार...

कोडोली-काखे रस्त्यावरील खड्डे बुजविताना आशीर्वाद तरुण मंडळाचे कार्यकर्ते

कोडोली - काखे रस्त्यावरील खड्डे बुजविताना आशीर्वाद तरुण मंडळाचे कार्यकर्ते...

 

कोडोली प्रतिनिधी : 

                           कोडोली-काखे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असताना, प्रशासनाची वाट न पाहता आशीर्वाद तरुण मंडळ, कोडोलीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविले. तरुण मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले जात आहे. कोडोली-काखे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. या खड्ड्यांमुळे यापूर्वीही अपघाताची परिस्थिती निर्माण झाली असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी आशीर्वाद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला.

आशीर्वाद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम...

आशीर्वाद तरुण मंडळ, कोडोली हे सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या मंडळांपैकी एक असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. रस्त्यावरील धोकादायक खड्डे निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्त्यांनी वेळ न दवडता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचे काम केले. या उपक्रमासाठी रोहित पाटील, तानाजी पाटील, राजवर्धन पाटील, अनिकेत पाटील, हर्षल वाडकर, प्रतीक जाधव, सौरभ पाटील, प्रथमेश कोळी, संतोष पाटील, अमोल कोळी आणि सुमित जामदार यांनी विशेष मेहनत घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तरुणांनी दाखविलेली ही सामाजिक जाणीव कौतुकास्पद असून, प्रशासनाच्या कामाची वाट न पाहता समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आशीर्वाद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांतून विशेष अभिनंदन होत आहे.

सर्व खड्डे बुजविण्याची मागणी :

आशीर्वाद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही धोकादायक खड्डे बुजविले असले तरी कोडोली-काखे रस्त्यावर अद्याप अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून सर्वच खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेला आदर्श प्रशासनानेही गांभीर्याने घेऊन कोडोली-काखे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.



     इतर बातम्या :  

📰 वर्ल्ड इलेव्हन फुटबॉल अकॅडमी आयोजित १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न...

📰 ग्रामसभा सचिवपदाच्या कामकाजातून ग्रामपंचायत अधिकारी दूर; पन्हाळ्यात निवेदन..!

📰 मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात नैसर्गिक वनस्पती नष्ट केल्याप्रकरणी पाच जणांवर वनविभागाची कारवाई | पन्हाळा वन विभाग

Post a Comment

0 Comments