S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

ग्रामसभा सचिवपदाच्या कामकाजातून ग्रामपंचायत अधिकारी दूर; पन्हाळ्यात निवेदन..!

पन्हाळ्यात ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने ग्रामसभा सचिवपदाच्या कामकाजाबाबत निवेदन देताना पदाधिकारी

पन्हाळ्यात ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने ग्रामसभा सचिवपदाच्या कामकाजाबाबत निवेदन देताना पदाधिकारी.

पन्हाळा प्रतिनिधी  : 

                           ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याने ग्रामसभा सचिव म्हणून कामकाज न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पंचायत समिती पन्हाळा येथील वरिष्ठ सहाय्यक फिरोजशहा फरास यांनी स्वीकारले. निवेदनात ग्रामपंचायत अधिकारी श्री. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणीच्या निर्देशानुसार १८ ऑगस्ट २०२६ पासून पुढे अनिश्चित कालावधीकरिता ग्रामसभा कामकाजामध्ये ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी कामकाज करणार नाहीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापुढे युनियनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तसेच यापूर्वी नियोजित ग्रामसभांसाठीही ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेचे सचिव म्हणून कामकाज करणार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याबाबत योग्य त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष आनंदा तळेकर, पन्हाळा तालुका अध्यक्ष जयवंत चव्हाण-पाटील, सचिव अमित पाटील, सुभाष भोसल, जालिंदर गिरी गोसावी, स्वाती चव्हाण, मंगल गवळी, सुनंदा केनवडे आदी उपस्थित होते.

     इतर बातम्या :  

📰 मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात नैसर्गिक वनस्पती नष्ट केल्याप्रकरणी पाच जणांवर वनविभागाची कारवाई | पन्हाळा वन विभाग

📰 'नशामुक्त युवा' अभियानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन...

📰 प्रा. (डॉ.) प्रकाश चिकुर्डेकर यांची सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती 

Post a Comment

0 Comments