S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात नैसर्गिक वनस्पती नष्ट केल्याप्रकरणी पाच जणांवर वनविभागाची कारवाई | पन्हाळा वन विभाग |

मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्र प्रकरणी वनविभागाने कारवाई केल्यानंतर अधिकारी व संबंधित व्यक्ती
मसाई पठारात नैसर्गिक वनस्पती नष्ट केल्याप्रकरणी पाच जणांवर वनविभागाची कारवाई

पन्हाळा प्रतिनिधी  : 

मौजे बादेवाडी, कक्ष क्रमांक ८३५ येथील मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये जाऊन नैसर्गिक वनस्पती नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची रील इंस्टाग्राम या समाजमाध्यमावरील patilsuraj_02 या आयडीवर प्रसारित झाल्यानंतर वनविभागाने संबंधितांची चौकशी करून कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा व वनपाल पन्हाळा यांनी इंस्टाग्राम आयडीची माहिती घेऊन रीलमधील सूरज प्रकाश पाटील, रा. निवडे, ता. पन्हाळा, सुनील हिंदूराव गुरव, रा. सालुर्ले, ता. शाहुवाडी, रोहित सुनील जाधव, रा. कोलोली, ता. पन्हाळा, सूरज मारुती पाटील, रा.तांबेवाडी, ता.शाहुवाडी व सिद्धीराज जगदेव पाटील, रा. निवडे, ता. पन्हाळा यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान संबंधितांनी रील सर्वांनी मिळून केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून सदर प्रकरणी उपद्रव शुल्क रुपये ११,०००/- वसूल करण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक, कोल्हापूर धैर्यशील पाटील तसेच सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) प्रियंका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा अजित माळी, वनपाल पन्हाळा सागर पवार, वनरक्षक पन्हाळा राहुल जोगलवार व वनरक्षक कोलोली किरण पाटील यांनी केली.


    इतर बातम्या :  

📰 'नशामुक्त युवा' अभियानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन...

📰 प्रा. (डॉ.) प्रकाश चिकुर्डेकर यांची सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती 


Post a Comment

0 Comments