S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

स्व. केदार पाटील यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

स्व. केदार पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

वारणेचा वाघ फौंडेशन आरोग्य तपासणी शिबिर कोडोली
स्व. केदार पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कोडोली दि.  २० मार्च (प्रतिनिधी) :
                                        स्व. केदार प्रवीण पाटील यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त वारणेचा वाघ फौंडेशन, कोडोली यांच्या वतीने हौसिंग सोसायटी सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्व. केदार पाटील यांच्या प्रतिमेचे कुटुंबीयांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विविध शिबिरांना प्रारंभ झाला.

वारणेचा वाघ फौंडेशनच्या माध्यमातून गेली बारा वर्षे रक्तदान शिबिरासह वह्यावाटप, रुग्णवाहिका सेवा, आपत्ती काळात औषध वितरण, अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली. रक्तदान शिबिरात एकूण ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ७७ रुग्णांनी तपासणी करून घेतली. यामध्ये स्त्रीरोग, हाडांचे आजार, हृदयविकार आदी विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली. तसेच आयोजित रक्त तपासणी शिबिरात १२५ नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय, कोडोली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश महाडिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेश आपटे, डॉ. वैशाली पावसे, डॉ. प्रणव पाटील, तसेच वैद्यकीय व नर्सिंग स्टाफ उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य माणिक पाटील, मोहन चोपडे, यशस्वी फौडेशानच्या अध्यक्षा विनिता पाटील, विश्वासराव जाधव, डॉ. प्रताप पाटील, प्रकाश पाटील, विलास बुगले, डॉ. सोनिया कदम, शिरीष जाधव, मानसिंग पाटील, माजी पोलीस उपनिरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, माजी तालुका वैद्यकीय अधिकारी एस. बी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी वारणेचा वाघ फौंडेशनचे सदस्य प्रथमेश पाटील व डॉ. ज्ञानेश्वरी पाटील यांनी स्वागत केले. विजय शिंदे व आबासो महापुरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


 अजून वाचा :  

🔴 जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांना अडचण नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे

🔴अमित अशोकराव घाटगे (नाना) - लोकसेवेच्या वाटेवरचा दृढनिश्चयी तरुण नेता | Amit Ashokrao Ghatage Satave Panchayat Samit

Post a Comment

0 Comments