S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

पत्रकार बाबासाहेब जाधव यांना ‘निसर्ग सन्मान - राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’


Media Power Live – बाबासाहेब जाधव यांचा राज्यस्तरीय निसर्ग सन्मान पुरस्काराने गौरव
निसर्ग सन्मान – राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ स्वीकारताना पत्रकार बाबासाहेब जाधव.
 

खानापूर (प्रतिनिधी ) 

खानापूर येथे पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल बाबासाहेब जाधव यांना ‘निसर्ग सन्मान – राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात सत्य, समाजहित आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे शांती टाइम्स चे संपादक बाबासाहेब जाधव यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या अभ्यासपूर्ण, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 

निसर्ग फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योजक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात बाबासाहेब जाधव यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पत्रकारिता हे केवळ व्यवसायाचे माध्यम न मानता समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून वापरले आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, प्रशासनातील त्रुटी, जनसामान्यांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकहिताचे विविध विषय सातत्याने मांडत त्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर पोहोचले असून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यात त्यांच्या पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

पुरस्कार स्वीकारताना बाबासाहेब जाधव यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचा असल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा गौरव वाढला असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


  अजून वाचा 👇 : 

📰 कोडोली येथे मातृदिनानिमित्त ‘Selfie with Mother' स्पर्धेचे आयोजन; आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा

📰 पन्हाळ्यातील नायब तहसीलदार संजय वळवी यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ पुरस्कार

📰 ABP शिक्षण समूह मध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा

📰 कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Post a Comment

0 Comments