S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

ABP शिक्षण समूह मध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा

 

ABP Shikshan Samuh Maharashtra Din celebration Media Power Live

ABP शिक्षण समूहात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...

नवे पारगाव, प्रतिनिधी :
ABP शिक्षण समूह येथे ६७ वा महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली असून, संस्थेमध्ये कार्यरत सुरक्षा विभाग प्रमुख बाजीराव हिरवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या बाजीराव हिरवे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या मनोगतातून राज्याच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

संस्थेचे सचिव अमोलकुमार पाटील यांनी महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात ABP शिक्षण समूह हे भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणारे एक ज्ञानपीठ असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा आणि जागतिक आव्हानांना सामोरे जात प्रत्येकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वर्षभरातील योगदानाबद्दल सत्कार करून गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या सचिवा राजलक्ष्मी पाटील, संचालिका आकांक्षा पाटील, प्राचार्य एस. आर. पाटील, विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण, मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्यासह विविध विभागातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन बामणे मॅडम आणि खराडे मॅडम यांनी केले.

ABP शिक्षण समूह म्हणजे भारतीय संस्कृतीचं संवर्धन करणार विद्यापीठ आहे. - डॉ. ए. बी. पाटील

  अजून वाचा 👇 : 

📰 कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

📰 वारणानगर येथे ‘व्हिजन 2026’ गौरव सोहळा; UPSC यशवंतांचा भव्य सत्कार | Surajya Foundation 

Post a Comment

0 Comments