S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Kolhapur ST 120 new buses and modern bus stand inauguration event
 

कोल्हापूर, दि.१७ (प्रतिनिधी) :

कोल्हापूर विभागाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, विभागासाठी तब्बल १२० नवीन एसटी बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर विभागात एकूण २३ बसस्थानके असून, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी तब्बल १७ बसस्थानकांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आली असून, येत्या काळात सर्व बसस्थानके अत्याधुनिक स्वरूपात विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

🔹 जिल्ह्यात PPP तत्त्वावर बसस्थानकांचा विकास

जिल्ह्यातील सहा बसस्थानकांचा विकास सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर केला जाणार आहे. या माध्यमातून आधुनिक सुविधा, व्यवस्थापन सुधारणा आणि प्रवाशांसाठी अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच जयसिंगपूर बसस्थानकाच्या पुढील विस्तारासाठी याच आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

🔹 अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बसस्थानके

संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी ९ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सुमारे १८१३ चौ.मी. क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या बसस्थानकात ११ फलाट, प्रशस्त प्रतीक्षालय, वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, जनऔषधी केंद्र, पोलीस चौकी, उपाहारगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वाठार येथे ४ फलाटांचे आधुनिक बसस्थानक उभारण्यात आले असून, पेठवडगाव येथे १.४४ कोटी रुपये खर्चून ५ फलाटांचे सुसज्ज बसस्थानक साकारण्यात आले आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यात ८ फलाट, १७ दुकान गाळे आणि पोलीस चौकीसह अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन या बसस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त दोन मजल्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर PPP मॉडेल राबवून बदल घडवून आणण्याची गरज आहे. तसेच नवीन बसेसची वाढ, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देणे आवश्यक आहे. -  पालकमंत्री प्रकाश आबिटकर.

 अजून वाचा 👇 : 

📰 वारणानगर येथे ‘व्हिजन 2026’ गौरव सोहळा; UPSC यशवंतांचा भव्य सत्कार | Surajya Foundation

📰 माणगाव ग्रामपंचायत : एक आदर्श विकासाचा प्रवास Mangaon Gram Panchayat: A journey of exemplary development 


Post a Comment

0 Comments