HOTEL RENUKA

HOTEL RENUKA
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

ऊसतोड कामगार ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन : सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

ऊसतोड कामगार ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन : सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे
 

कोल्हापूर / प्रतिनिधी :  
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : ऊसतोड कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र मिळण्याबाबत नोंदणी करावी, असे आवाहन  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाले लोंढे यांनी केले आहे. 
राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकाने संबंधित गावातील, वस्त्यांमधील, तांड्यामधील व पाड्यांमधील व इतर नोंदणी करावी. 
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी ओळखपत्र मिळण्याबाबत नोंदणी करण्यासाठी अर्ज स्वत: भरुन अथवा ग्रामसेवक यांच्याकडून सादर करावा. जेणे करुन ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेण्यात यावी अथवा सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारेमाळ, दूरध्वनी 0231/2651318 वर संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

Yashwant Dharmartha Ayurvedic Rugnalay Kodoli (Prakriti Panchakarma Wellness Centre Kodoli)

Post a Comment

0 Comments