माणगाव ग्रामपंचायत : एक आदर्श विकासाचा प्रवास
माणगाव ग्रामपंचायत : एक आदर्श विकासाचा प्रवास
माणगाव हे गाव म्हणजे प्रगतिशील विचार आणि सुसंस्कृततेचा उत्तम नमुना आहे. अनेक पुरस्कार आणि उपक्रमांद्वारे माणगाव ग्रामपंचायतीने आपले नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केलेचे दिसून येते या गावाचा विकास आणि ग्रामस्थांचा सहभाग, तसेच गावातील सुविधांच्या उन्नतीचा हा प्रवास एक प्रेरणादायी कथा आहे. गावातील रस्त्याचे रुंदीकरण करून ग्रामपंचायत ने वाहतूक सुलभ केलेची दिसून येते पर्यावरण रक्षणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. वृक्षारोपण मोहीमेत माणगाव फाटा ते गावापर्यंत ७०० झाडांची लागवड करण्यात आली आहे.तसेच गावातील ऊर्जा व्यवस्थापनही अभिनव आहे. माणगाव फाटा ते गावापर्यंत स्ट्रीट लाइट्स बसविण्यात आले आहेत. गावात CCTV बसवून सुरक्षेची पक्की व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील स्वच्छता मोहीम खरोखरच कौतुकास्पद आहे. ९०% गटर्स बंदिस्त केलेचे दिसून येते तर दर महिन्याला फॉगिंग मशीन द्वारे औषध फवारणी करुन स्वच्छता राखली जाते. आरोग्य शिबीर दर महिन्यात दोन वेळा आयोजित करून लोकांच्या आरोग्याची ही काळजी घेतली जाते.
माणगाव ग्रामपंचायतीने कोरोना काळात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर स्थापन करून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली तर कोविड सेंटर चालवून २५० हून अधिक रुग्णांची देखभाल ही केली तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळनेसाठी टीव्हीवरील शाळेच्या हा उपक्रम राबविला. आणि कोरोना काळात अनेक ग्रामस्थांना आवश्यक वस्तूंचे मोफत वाटप करून ग्रामपंचायतीने त्यांच्या गरजा भागवल्या. गावात २०० महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना बँकांकडून अर्थसाहाय्य पुरविण्यात आले असून गारमेंट आणि कॉम्प्युटर प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनविण्यात आले आहे. गावात दारूबंदी करून कुटुंबांना उध्वस्त होण्यापासून वाचवण्यात आले आहे. याशिवाय, विधवा महिलांवर होणाऱ्या अमानवी कृत्यांना थांबवण्यासाठी विधवा प्रथा बंदी लागू केली आहे. महिलांसाठी दरवर्षी महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रोजगार दिला जातो, तसेच गावातील वृद्धांसाठी नाना-नानी पार्क तर ग्रामस्थांसाठी ओपन जिम उभारण्यात आली आहे. युवकांसाठी खेळाचे ग्राउंड तयार करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय आणि शासकीय कार्यालयांत सौरऊर्जेचा वापर करण्यात आला आहे,त्यामुळे ऊर्जेची बचत होतेच आणि सतत वीज पुरवठा होतो.तसेच ओला कचरा गावातून संकलन करून गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावाने प्लास्टिकबंदीचा ठराव करून कापडी पिशव्यांचा वापर प्रोत्साहित केलाचा दिसून येतो तसेच ग्रामपंचायतचे पेपरलेस कामकाज करून प्रशासन सुलभ करण्यात आलेचे दिसून येते. माणगाव ग्रामपंचायतीने सामाजिक कार्यकर्ते बापू कांबळे यांना सन्माननीय सरपंच म्हणून सन्मान दिला आहे. तर विधवा महिला सरपंच ही अभिनव कल्पना राबवून समाजात महिलांच्या स्थानाला उंची दिली आहे. गावातील शिक्षणाच्या क्षेत्रातही माणगावने नवा अध्याय लिहिला आहे. विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक योजना सुरू करण्यात आली असून, प्रत्येक वर्गात गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह दिले जाते. तसेच, गावातील शाळेत CCTV बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. MPSC अभ्यास केंद्राच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता येते.

माणगावाने जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या पाच एकर तलावामुळे संपूर्ण गावातील पाण्याची पातळी वाढली आहे. उन्हाळ्यातही जलस्तर कायम ठेवण्यासाठी पंचगंगा नदीच्या पाण्याचा वापर करून तलाव भरला जातो, ज्यामुळे जनावरांसह शेतीसाठी मुबलक पाणीपुरवठा होतो. तर जल जीवन योजना अंतर्गत प्रत्येक घरात फिल्टर पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे, तर वॉटर एटीएम द्वारे गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवून देण्यात आले आहे. सोशल मिडियाचा योग्य वापर करून ग्रामपंचायतीने तक्रार निवारण WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावरून आलेल्या गावातील तक्रारी २४ तासांत सोडविण्याची योजना राबवली आहे. माणगाव ग्रामपंचायत म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिक विकासाचा आदर्शच येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकारांमुळे हे गाव संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान बनले आहे.
- सरपंच : डॉ. राजू उर्फ अभयकुमार आप्पासो मगदूम
- उपसरपंच : विद्या उमेश जोग
माणगाव ग्रामपंचायतीने अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात मुख्यत्वे:
- संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रथम क्रमांक (२००३-०४) ग्रामस्वच्छतेसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे हे उत्कृष्ट फळ.
- यशवंत सरपंच पुरस्कार (तालुका स्तर, २००४-०५) गावातील नेतृत्व आणि प्रगतिशील निर्णयांची कदर करून हा पुरस्कार मिळाला.
- यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार (जिल्हा स्तर, २०१८-१९) ग्रामपंचायतीच्या समर्पित प्रयत्नांना जिल्हा पातळीवर मिळालेली मान्यता.
- स्मार्ट ग्राम पुरस्कार (तालुकास्तर, २०१८-१९) स्मार्ट तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासाठी गावाने घेतलेल्या पुढाकारांची पावती म्हणून मिळालेला पुरस्कार.
- सत्यशोधक केशवराव विचारे सामाजिक प्रेरणा पुरस्कार (२०२२-२३) सामाजिक कार्यामध्ये पुढे असलेल्या गावासाठी हा सन्मान.
Promoted Content :
0 Comments