जिद्दीने स्वप्नपूर्ती करणारे व्यक्तिमत्व - श्री. विश्वास बाळासाहेब चव्हाण.
ध्येय निश्चित असेल तर, स्वप्नपूर्ती करता येते. वाटेत येणाऱ्या अडचणींवर, अलगद मात करता येते. येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना जिद्दीने आणि चिकाटीने विश्वास चव्हाण यांनी केला आहे. विश्वास चव्हाण हे सीमा बायोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. सध्या वार्षिक उलाढाल ६ कोटी रुपयांचा टप्पा त्यांनी गाठला आहे. शेतकऱ्याने निर्माण केलेली पहिली आणि सर्वात मोठी टीश्युकल्चर लॅबची उभारणी त्यांनी केली. २००२ पासून व्यवसायला सुरुवात केली आणि शेतीस पूरक असणारा व्यवसाय करावा, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. शिक्षण घेत असतानाच टोमॅटो आणि वांगी ह्या पालेभाज्यांचे पीक ते घेत होते. एम. एस. सी. ऍग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट करत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की वडिलांनी सांगितल्याप्रमाणे शेतीस पूरक असणारा व्यवसाय करायचा.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधील सर्व टिश्यूकल्चर लॅब ची पाहणी त्यांनी टू व्हीलर च्या साहाय्याने प्रवास करत केली. त्यावेळीस ही संकल्पना पूर्णतः नवीन होती. सुरवातीस व्यवसायास पूरक असणारे भांडवल त्यांचाकडे उपलब्ध नव्हते मग त्यांनी बाहेरील टिश्यू कल्चर लॅब मधून छोटी रोपे घेतलीत जी की टिश्यू कल्चर मध्ये ९ महिने वाढलेली असतात नंतर ती रोपे ग्रीन हाऊस मध्ये १ महिना वाढलेली असतात. रोपांना नीट मातीच्या पिशव्यामध्ये त्यांची लागवड करुन मोठी करायचीत व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना विकायचीत. अवघ्या ३५ हजारामध्ये व्यवसायास सुरुवात त्यांनी केली. १० गुंट्टयामध्ये शेडनेट उभी करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या आईवडिलांनी परिश्रम घेतले. नंतर २५ हजार रुपयांची छोटी रोपे पुण्याहून त्यांनी आणली व त्या रोपांवर एका रसायनाची फवारणी त्यांनी केली असता, सुरुवातीस आणलेली रोपे खराब झालीत मात्र त्यांच्या आईवडिलांनी त्यांना प्रोत्साहन देऊन नंतर ती रोपे आणण्यास सांगितले व तेथून त्यांच्या व्यवसायास चालना मिळाली.
२००२ साली टिश्यू कल्चर केळी हा प्रयोग महाराष्ट्रासाठी नवीन होता. ह्यावेळी ही ते बाहेरील टिश्यू कल्चर लॅब मधून ती रोपे आणून दुसऱ्या स्टेज मध्येच त्यांची वाढ करुन विकत असतं. असे त्यांनी २ वर्ष केले मात्र ह्या कालावधीत त्यांना काही वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं म्हणून त्यांनी स्वतःचीच टिश्यूकल्चर लॅब उभारण्याचा निर्णय घेतला. नंतर त्या संदर्भातील माहिती एकत्रित करण्यासाठी उर्वरित टिश्यूकल्चर लॅब, भांडवल उभारणीसाठी बँकेची मदत घेण्याचा त्यांचा विचार होता, पहिल्या प्रयत्नात त्यांना बँकेने कर्ज नाकारले. नंतर बँक मॅनेजरने त्यांच्या शेतीची व नर्सरीची पाहणी केली असता त्यांना २५ लाखाचे कर्ज मंजूर करून दिले.
१ ऑगस्ट २००४ ला टिश्यु कल्चर लॅब ची उभारणी पूर्ण केली. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना खूप मोठे नुकसान झाले. परंतु ते डगमगले नाहीत त्यांनी हार मानले नाही त्यांनी त्यांचे काम चालू ठेवले. सप्टेंबर २००५ नंतर व्यवसायाला गती मिळाली. २०१२ सालच्या दुष्काळाच्या काळात तब्बल ७० लाख रुपयांची केळीची रोपे टाकून द्यावी लागली. नंतर त्यांनी एका व्यवसायावर अवलंबून न राहता त्यास पूरक असणारे व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सॉईल वॉटर टेस्टिंग लॅब, बायोफर्टीलायझर लॅब, मक्याच फ्रोजन उद्योग, ड्रीप इर्रीगेशन फॅक्टरी असे जोड व्यवसाय त्यांनी सुरू केले. सध्या त्यांच्याकडे २०० कामगार काम करत आहेत. ९० टक्के स्थानिक महिलांना रोजगार. सीमा बायोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीमार्फत मिळाला आहे.
कंपनीमध्ये तयार होणारी रोपे :
केळीची रोपे लागवड वर्षभरात ३० लाख एवढी बनवतात.त्याचबरोबर वर्षभरात १५ लाख बाबुंची रोपे तयार करतात, तर सागवान ५ लाख रोपे तयार करतात. काही प्रमाणात शोभेची असणारे रोपेही तयार केली जातात. ही सर्व रोपे संपूर्ण भारतामध्ये पाठवली जातात. गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांमध्ये केळीची रोपे पाठवली जातात. त्याचबरोबर इथोफिया, केनिया,बांगलादेश या ठिकाणी ही केळीची रोपे त्यांनी पाठवली आहेत. तसेच त्यांनी खाजगी आणि सरकारी संस्था नाही टिशू कल्चर मध्ये तयार होणारी रोपे पाठवली आहेत. गुणवत्ता आणि उत्तम प्रकारची सेवा हीच त्यांची खरी ओळख आणि ताकद आहे आणि त्यामुळेच त्यांचं कामही खूप जोमाने सुरू आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप मेहनत त्यांनी घेतली आहे. सोबत असते तरुण पिढीसाठी एक उत्तम उदाहरण तर आहेतच आणि ते तरुणाईला प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन देखील करत आहे. विश्वास चव्हाण यांना २२ वर्षांचा उतीसंवर्धन वनस्पतींचे उत्पादन, हायटेक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच कंपनीच्या संचालिका लतिका विश्वास चव्हाण यांना १५ वर्षांचा उती संवर्धन वनस्पतींचे उत्पादन उच्च चाचणी शेती यांचा अनुभव आहे.
विश्वास चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार :-
उद्योग रत्न पुरस्कार, शेती प्रगती पुरस्कार, पोलादी पुरुष पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी चव्हाण यांना सन्मानित केलेले आहे.
Contact Information :
E-Mail :- seemabiotechpvtltd@gmail.com
Website : - https://www.seemabiotech.in
Mobile No : +91 9881547622, +91 9922929699
Promoted Content :
0 Comments