प्राचार्य डॉ. ए. एम. शेख,  यांच्या हस्ते वृक्ष लागवड सोबत डॉ. सी. आर. जाधव, डॉ. आर. पी. कावणे,सहाय्यक ग्रंथपाल श्री. भालचंद्र शेटे, ग्रंथालय कर्मचारी आणि स्वयंसेवक .


वारणानगर \ प्रतिनिधी : 

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वन सप्ताह निमित्त २२५ होऊन अधिक पर्यावरण पूरक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यामध्ये जांभूळ, पिंपळ, कडूनिंब व करंज अशा वृक्षांचे लागवड करण्यात आली. प्राचार्य, डॉ. ए. एम. शेख यांच्या हस्ते ग्रंथालय परिसरात वृक्षाचे लागवड करण्यात आली.  महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०० स्वयंसेवकांना प्रति स्वयंसेवक एक झाड लावण्याचे आव्हान केले होते, त्यानिमित्त स्वयंसेवकांनी आणि विभागाच्या वतीने २२५ वृक्षांची लागवड केली. 

यानिमित्त श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे सावकर साहेब, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. वृक्ष लागवडीत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. वन सप्ताहाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सी. आर. जाधव  डॉ.आर.पी.कावणे यांनी केले, तर वृक्ष लागवडीसाठी सहाय्य ग्रंथपाल श्री. भालचंद्र शेटे ग्रंथालय कर्मचारी श्री. बाजीराव मोरे, श्री. घोलप, श्री. नंदकुमार देसाई यांनीही सहभाग घेतला. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी व सप्ताह निमित्त वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी झाले होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रांजल हुजरे, स्नेहा जंगम, सार्थक निकम अशा विविध स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.




  हे हि वाचा : 

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या "वारणा २०२२-२३" या शैक्षणिक वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन संपन्न...

➦ गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

➦ तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन  २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत  निवड  झालेल्या  विद्यार्थ्यांचा  गौरव... 

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "जागतिक पर्यावरण दिन", विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.