राजकीय क्षेत्रात दादा म्हणून संबोधले जाणारे मा. अजितदादा पवार. / Ajit Dada Pawar (Deputy Chief Minister of Maharashtra)

Hon. Ajit dada Pawar (Leader of Opposition in the Maharashtra Legislative Assembly)

                                 (Deputy Chief Minister of Maharashtra)

स्पष्ट वक्तव्यामुळे ओळखले जाणारे,
प्रसार माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत असणारे.
समाज कार्यासाठी सतत पुढाकार घेणारे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून कार्यरत असणारे.

      अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मा. शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजितदादा पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर येथे आजोबांच्या घरी झाला. अनंतराव पवार असे त्यांच्या वडिलांचे नाव असून ते प्रारंभी प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या मुंबई मधील 'राजकमल स्टुडिओ' साठी काम करत होते. अजितदादा पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी व्यापारावर नोकरी करत होते आणि त्यांची आजी कौटुंबिक शेतीची देखभाल करीत होती. देवळाली प्रवरा येथे अजितदादा पवार यांनी प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचे काका शरद पवार हे सत्ताधारी काँग्रेस मधील एक राजकीय नेते बनले होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी संस्थामध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरुवात केली. येथेच त्यांना राजकारणाचं बाळकडू शरद पवार यांच्या कडून त्यांना मिळालं. नंतर पुन्हा ते बारामतीत आले वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी स्वतः च्या खांद्यावर घेतली. 

      अजितदादा पवार यांची १९८२ साली जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर निवड झाली तेव्हाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते १६ वर्षे पदावर राहिले. या काळात ते बारामतीचे लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडून आले. अजितदादा पवार हे जून१९९१ ते नोव्हेंबर १९९२ आणि नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या दरम्यान ते कृषी, फलोत्पादन, जलसंधारण ऊर्जा, नियोजन अशा खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यानंतर अजित दादा पवार यांनी मागं वळून पाहिलं नाही. ते बारामती येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये अजित दादा याच मतदारसंघातून निवडून आले. त्यांना राजकारणातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडविणारे नेते म्हणून ओळखलं जातं. ते २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ८० तासांपेक्षा कमी काळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ६५ हजार मतांच्या मताधिक्याने अजितदादा पवार निवडून आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वात कमी कालावधी नंतर ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाविकास आघाडीच सरकार सत्तेत येऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. याच सरकारमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. महाविकास आघाडीच सरकार पडल्या नंतर त्यांच्याकडे राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी आली. अजितदादा पवार यांना त्यांच्या स्पष्ट वक्ते आणि फटकळ बोलण्यामुळे ही ओळखलं जातं. यामुळे ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामध्ये अडकलेले पाहायला मिळतात मात्र त्यानंतर तेवढ्याच तत्परतेने दिलगिरी ही व्यक्त करतात. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे नाव आहे.ज्या नावाची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये नेहमीच होतच राहते, तसेच विरोधकांच्या टीका ह्या त्यांच्यावर नेहमी सुरूच असतात, तरीही ते त्या टिकांना सामोरे जाऊन विकासकामांत  अडथळा येऊ देत नाहीत आणि विकास कामे सतत चालू ठेवतात. त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये विकास कामे करून त्या शहराचा कायापालट केला आहे. 

      महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना दुष्काळ ग्रस्त ज्यावेळेस अजितदादा यांच्या जवळ आपली कैफियत मांडायला गेले होते तेव्हा त्यावेळी बेताल वक्तव्य करून त्यांनी जनतेचा रोष ओढवून घेतला. राजकीय आणि प्रसार माध्यमांचा दबाव वाढल्याने त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची वेळ आली ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे त्यांनी नंतर प्रसार माध्यमांसमोर कबूल देखील केले आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले परंतु अद्याप एकही आरोप सिद्ध झालेला नाही. निंबाळकर पाटील या माजी मंत्र्याच्या सुनेत्रा या कन्येशी अजितदादा पवार हे विवाहबद्ध झाले. सुनेत्रा पवार ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहावे ह्यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असत. अजितदादा पवार यांच्या गैरहजेरीत बारामती च्या विकासाकडे ही त्यांचं लक्ष असत. ह्या दाम्पत्यांना पार्थ आणि जय ही दोन अपत्ये आहेत. 

      अजितदादा पवार हे आज अनेक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर आहेत, या व्यतिरिक्त भवानी नगर ता. इंदापूर जि. पुणे येथील छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून ते काम पाहतात. पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर देखील ते कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त इतर अनेक उच्च पदांचा पदभार ते सांभाळत आहेत. शरद पवार यांच्या कडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले असल्याने अजितदादांच  टायमिंग ही जोरदार असते. शरद पवार यांच्या ईडी प्रकरणात राजीनामा असो किंवा मग एका रात्रीत भाजपला पाठिंबा असो किंवा यापूर्वी केलेलं त्यांनी बंड असो.  समाजकल्याणासाठी सतत झटत राहणाऱ्या कार्यकर्तृत्वाला सलाम. 

                                                                                                                            धन्यवाद...!    


  हे हि वाचा : 

 भारत देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजींची जीवनकहाणी. Narendra Modi Prime Minister of India

➦ गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)


Post a Comment

0 Comments