भारत देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजींची जीवनकहाणी. Narendra Modi Prime Minister of India

शून्यातून प्रगतीपथाकडे वाटचाल केलेले, स्वतः साठी नाही, तर समाजकार्यासाठी झटलेले.
लोकप्रिय, प्रतिभावंत, दूरदृष्टीकोन जोपासणारे, तरूण पिढीसाठी आदर्श स्थान असणारे. 
असे प्रतिष्ठित व्यक्तीमत्व भारत देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदींजी. 

भारत देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजींची जीवनकहाणी. Narendra Modi Prime Minister of India

गुजरात मध्ये सर्वसामान्य घरात १७ सप्टेंबर १९५० रोजी दामोदरदास मूलचंद मोदी आणि हिराबेन  मोदी या दांपत्याच्या पोटी जन्मलेले पुत्ररत्न अर्थातच मा. श्री नरेंद्र दामोदरदास मोदी. मोदीजी त्यांच्या एकूण भावंडांपैकी ते ३ नंबरचे अपत्य आहेत.त्यांचे वडील गुजरात मधील रेल्वेस्टेशनवर एक छोटेसे चहाचे दुकान चालवित असत आणि त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असत. बालपणापासूनच मोदींजींच्या अंगी कष्टाळू वृत्ती असल्याने ते त्यांच्या वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ट्रेन च्या डब्ब्यामध्ये जाऊन चहाची विक्री करत असत. ज्यांच्या मनी देशासाठी असणारे नित्तांत प्रेम आणि देशभक्ती एवढी तीव्र आणि जागृत असते ना, त्यांच्यासाठी कोणतेही ध्येय साध्य करणे कठीण नसते. मोदीजींनी त्यांचे शालेय शिक्षण वडनगर मधून पूर्ण केले. १८ वर्षांचे असताना त्यांचा विवाह यशोदाबेन याच्याशी झाला होता परंतु लग्नानंतर २ वर्षानी घर सोडून मोदीजींनी संन्यास घ्यायचे ठरविले. त्यांचे म्हणणे असे होते की एका विवाहितापेक्षा अविवाहित व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधी अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. मोदींजी  बालपणापासूनच देशभक्ती करत होते. १९६२ च्या वर्षी भारत- चीन युद्ध झाले होते. त्यावेळी मोदींजी रेल्वेस्टेशनवर  भारतीय सैनिकांनी भरलेल्या ट्रेनमध्ये त्यांच्याकरिता जेवण व चहा घेऊन जात होते. १९६५ मध्येही भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळीही मोदीजींनी भारतीय सैनिकांची खूप मनोभावे सेवा केली. १९७१ मध्ये RSS ते प्रचारक झाले आणि ते त्यांचा संपूर्ण वेळ RSS साठी देऊ लागले. सकाळी ५:०० वाजता उठायचे आणि रात्री उशिरापर्यंत काम करत रहायचे. प्रचारक पदी असताना ते गुजरात मधील अनेक ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या अगदी जवळून अनुभवत होते. पुढे भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ म्हणूनही ते कार्यरत होते. 

१९७५ च्या आसपास राजनीती क्षेत्रामध्ये असणाऱ्या वादांमुळे त्या वेळी  पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींनी काही राज्यांमध्ये आपत्कालीन घोषित केले होते आणि त्याचवेळी Rashtriya Swayamsevak Sangh(RSS) सारख्या संस्था वरही प्रतिबंध घातले गेले. तरीही मोदींजी नकळतपणे देशसेवा करतच राहिले आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा विरोध केला आणि याचदरम्यान त्यांनी एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव'संघर्ष माँ गुजरात' असे होते. ह्या पुस्तकात त्यांनी गुजरातच्या राजनीती वरती लिहिले होते. RSS चे प्रचारक असताना १९८० मध्ये गुजरात युनिव्हर्सिटी मधून राजनीती विज्ञान ह्या विषयामध्ये पदवी प्राप्त केली. RSS मध्ये खूप चांगले कर्तव्य पार पाडत असल्यामुळे त्यांना भाजपमध्ये नियुक्त केले. ज्यामध्ये त्यांनी १९९० साली आडवाणीच्या अयोध्या यात्रेचे भव्य आयोजन केले. त्यामुळे भाजपमधील अनुभवी व ज्येष्ठ नेते खूप प्रभावित झाले. पुढे ही त्यांच्या अनेक सामाजिक कार्यामुळे भाजपमध्ये त्यांचे स्थान उंचावत गेले आणि त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले. त्यांच्या पार्टीने गुजरात मधील १९९५ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये बहूमतांनी आपले सरकार स्थापन केले. मोदींजी सोबत काही वाद झाल्या कारणाने शंकरसिंह वघेलाने पार्टीला राजीनामा दिला. त्यानंतर केशुभाई पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री पद दिले आणि मोदीजींना दिल्लीत बोलावून भाजपच्या संघटन कार्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्री पद दिले गेले. त्यांनी ह्या जबाबदारीलाही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले. २००१ मध्ये केशुभाई पटेल यांची तब्येत बिघडू लागली आणि भाजप निवडणूकीमध्ये ही काही  सिट्स हारल्या. ह्यानंतर भारतीय जनता पार्टीने ऑक्टोबर २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदींजींना गुजरातचे मुख्यमंत्री पद दिले. त्यांचा कार्यकाळ ७ ऑक्टोबर २००१ पासून सुरू झाला. त्यानंतर त्यांनी राजकोट विधानसभा निवडणुक लढवली ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अश्विन मेहतांना मोठ्या बहूमतांनी पराभूत केले. मुख्यमंत्री पदावर असताना नरेंद्र मोदींनी सुनियोजित पद्धतीने त्यांनी त्यांचे कामकाज पाहिले आणि गुजरातला पहिल्यासारख मजबूत बनवलं. त्यांनी गावागावांमध्ये विजेची सोय केली. पर्यटनासाठी प्रोत्साहन दिले. देशात पहिल्यांदाच कोणत्यातरी राज्यातील सर्व नद्या एकमेकांना जोडल्या गेल्या, जेणेकरून संपूर्ण राज्यात पाण्याची समस्या दूर झाली. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सोलर पार्क निर्माण गुजरात मध्ये झाले आणि ह्यासारखी अनेक सामाजिक कामे मोदींजीनी केली. बघता बघता गुजरातला भारतातील सर्वात उत्कृष्ट असणारे राज्य बनविले आणि ते गुजरातचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री बनले. त्यांनी घेतलेले अचूक निर्णय आणि विविध कार्यासाठी गुजरातच्या लोकांनी त्यांना तब्बल ४ वेळा मुख्यमंत्री बनविले.

नंतर मार्च २००२ मध्ये गुजरातच्या गोधरा ट्रेन घोटाळा प्रकरणी त्यांचे नाव जोडले गेले, ह्या प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्स ने मोदी प्रशासनास जबाबदार ठरविले. काँग्रेस सहित इतर विरोधी पक्षांनी मोदींजींच्या राजीनाम्याची मागणी केली. गोधरा ट्रेन घोटाळा प्रकरणी २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गुजरातच्या गोधरा नावाच्या शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर साबरमती ट्रेनला F6 कोचला आग लावल्याने ५९ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरात मध्ये अनेक दंगली झाल्या. २८ फेब्रुवारी २००२मध्ये गुजरातच्या काही ठिकाणी दंगली खूप मोठ्या दंगली झाल्या त्यामध्ये १२०० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. ह्यानंतर ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष चौकशी दल बनविले आणि डिसेंबर २०१० साली चौकशी दलाच्या असे निदर्शनास आले की, घडलेल्या दंगलीमध्ये नरेंद्र मोदींजी विरूद्ध कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. 

गुजरात मधील नरेंद्र मोदीजींचे यश पाहता भारतीय जनता पार्टी (BJP) च्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदींना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा पंतप्रधान उमेदवार म्हणून घोषित केले. त्यानंतर त्यांनी भारतामध्ये अनेक प्रचार दौरे केले सोबतच सोशल मीडियाचाही  योग्य वापर केला. लाखो लोकांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवले. मोदीजींची कार्ये, त्यांचे प्रेरणादायी भाषण, देशाप्रती असणारी त्यांची देशभक्ती आणि दूरदृष्टीकोन विचारसरणी यांमुळेच त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला. ते भारतातील १५ वे पंतप्रधान झाले. स्वतः च्या बुद्धीच्या, जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावरच त्यांनी ही प्रगती मिळविली आहे. ते १८ तास काम करतात आणि काही तासच झोपतात. मोदीजींचे असे म्हणणे आहे की, अहोरात्र केलेले कष्ट कधीच मानवाला थकवा जाणवू देत नाहीत तर ते आत्मिक समाधान देतात. मोदीजी असेही म्हणतात की, त्यांच्याजवळ त्यांची वडिलोपार्जित कोणतीही संपत्ती नाही, जवळ आहे तो केवळ त्यांच्या आईने दिलेला आशिर्वाद. प्रामाणिकपणे अविरत कार्य करणाऱ्या कार्य कर्तृत्वास सलाम.

                                                                                                                              धन्यवाद...!


 हे हि वाचा :

गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) / Biography of Dr. Vinay Vilasrao Kore. (savkar)

राज कीय क्षेत्रात दादा  म्हणून संबोधले जाणारे मा. अजितदादा  पवार. / Biography of ajit dada pawar 

Post a Comment

0 Comments