S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

समाजकार्यातून राजकारणाकडे | रणजीत चौगुले RC | कोतोलीतील तरुण नेतृत्वाचा प्रवास | Panchayat Samiti Panhala

Ranjit Chougule RC, Young Leader from Kotoli, Panhala

| सुहास पाटील – Media Power Live |

 समाजकार्यातून राजकारणाकडे — रणजीत चौगुले (RC) कोतोली पंचायत समिती मैदानात

कोतोली परिसरातील सामाजिक कार्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे रणजीत चौगुले (RC) हे गेली १५ वर्षे निस्वार्थ भावनेने समाजासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी २४ तास तत्पर राहणाऱ्या या तरुणाने कामातून विश्वास जिंकला आहे. कॉलेज जीवनातच नेतृत्वाची बीजे पेरली गेली होती. श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी (GS) म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला. कोविड काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या निस्वार्थ कार्याचा गौरव कोविड योद्धा पुरस्कार देऊन करण्यात आला. कोतोली मेन रोडवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर त्यांनी वारंवार प्रशासनाला जागे केले, आणि प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वखर्चातून रस्ते दुरुस्त करून समाजासमोर जबाबदारीचे उदाहरण ठेवले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते वायफळ खर्च न करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, अनाथाश्रम व कुष्ठधामांना मदत अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करतात. आजवर त्यांच्या रक्तदान उपक्रमांमुळे अनेकांचे जीव वाचले असून, कोणीही रक्तासाठी संपर्क केल्यास ते तत्काळ उपलब्ध करून देतात हेच त्यांचे खरे बळ आहे.

क्रीडा क्षेत्रातही रणजीत चौगुले यांनी मोठं योगदान दिलं आहे. विविध गावांतील तालमींना त्यांनी साहित्य वाटप करून प्रोत्साहन दिलं असून, युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून शरीरसौष्ठव (Bodybuilding) या क्षेत्राकडे वळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, एका सर्वसामान्य हमालाचा मुलगा आज समाजकार्यातून राजकारणात पाऊल ठेवत आहे. त्यांच्या जिद्दीने, लोकसंपर्काने आणि युवकांच्या फळीमुळे त्यांना कोतोली पंचायत समिती मतदारसंघातील प्रभावी कार्यकर्ता म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांनी प्रत्येक गावात युवकांची एक मजबूत फळी तयार केली असून तीच त्यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सामाजिक प्रवासात घुंगरू गावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील साहेब हे त्यांचे प्रेरणास्थान असून, डॉ.चेतन नरके यांच्या युवा नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत. 

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ते दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करतात. त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्व जाती-धर्मांमध्ये मिळून मिसळून राहणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

हनुमान उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. बळवंत पाटील मास्तर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.शंकर पाटील हे त्यांचे राजकीय गुरू आहेत. आज रणजीत चौगुले (RC) हे नाव म्हणजे सामान्य माणसातून उभं राहिलेलं असामान्य व्यक्तिमत्व एक असा जनतेचा नेता जो म्हणतो, पद महत्त्वाचं नाही, जबाबदारी महत्त्वाची आहे.


  इतर बातम्या   :  

🔴 Prashant Bugale Biography | कोल्हापूरचा युवा आवाज – प्रशांत बुगले यांची प्रेरणादायी वाटचाल| Bhartiy Janata Party

🔴पुण्यातील नामांकित Kekiz Cake House आता कोडोलीत – गोड क्षणांना नवा स्पर्श! | Kekiz Cake House Kodoli

Post a Comment

0 Comments