तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव... Tatyasaheb Kore Institute of Engineering & Technology (An Autonomous Institute)

Tatyasaheb Kore Institute of Engineering & Technology (An Autonomous Institute)

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय (स्वायत्त महाविद्यालय)  आयोजित सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवानिमित्त आयोजित केलेल्या "प्लेसमेंट डे" च्या कार्यक्रमा निमित्त उपस्थित डॉ. विनय  कोरे -सावकर , डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रा. पी. जे. पाटील, निवड झालेले विद्यार्थी व सहकारी

वारणानगर/ प्रतिनिधी : 

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय येथे सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्या निमित्त "प्लेसमेंट डे " या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असतान श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समुहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) बोलत होते कि, आज तुम्ही वारणेतून अभियंता होऊन बाहेर पडणार व नोकरीसाठी कंपनीत जॉईन होणार तरीसुद्धा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात Artificial intelligence (AI), chat gpt यासारख्या अनेक नव-नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. नोकरी करत असताना विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानं अवगत केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, "तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ वारणेमध्ये घालवलेला आहे आणि नोकरी मिळवून तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा गौरव केलेला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर वारणेचा विद्यार्थी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा असे मत त्यांनी मांडले. महाविद्यालयास स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यामुळे इंडस्ट्रीला लागणारा अभ्यासक्रम तयार करता येतो असेही त्यांनी सांगितले.

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम म्हणाल्या की, "प्लेसमेंट डे तरुण अभियंत्यांच्या आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय क्षण आहे. अशीच यशाची शिखरे यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यात गाठावीत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशाची आठ सूत्रे सांगितली. त्याचबरोबर ही आठवण करून दिली की, तुम्ही प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेताना महाविद्यालयाकडून दिलेली सर्व वचने आज पूर्ण झाली.

कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव, आयुष्यातील यशो शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास   विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असावा यासाठी महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला. 

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांनी यावर्षात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाल्याचे सांगितले. हा एक आगळावेगळा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रा मध्ये पहिल्यांदाच होत असल्याचे ही ते म्हणाले. या "प्लेसमेंट-डे", चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे व प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा आहे. जागतिक मंदीच्या काळातही महाविद्यालयाचे प्लेसमेंट कार्य उल्लेखनीय आहे. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी सुरू केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालया बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळच्या सत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विभागांमध्ये प्रशस्तीपत्र व टी-शर्ट देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभव कथन करून आयुष्यातील यशो शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सांगून  विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असावा यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, स्टाफ इतर कर्मचारी व देश विदेशात विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     हे हि वाचा  :     

🔴 नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना पारंपारिक पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे : प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर.

🔴  यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न... Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)


Post a Comment

0 Comments