HOTEL RENUKA

HOTEL RENUKA
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

वारणा महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद जयंती साजरी – 'वारणा संवाद क्लब' ची स्थापना आणि साहित्य विशेषांकाचे प्रकाशन | warana university

 

वारणा महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद जयंती साजरी – 'वारणा संवाद क्लब' ची स्थापना आणि साहित्य विशेषांकाचे प्रकाशन

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात प्रेमचंद जयंती भित्तिपत्रक प्रकाशन समारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ.ए. एम. शेख, प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर सोबत सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी.

वारणानगर   | दि. ०१ ऑगस्ट .

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये महान हिंदी लेखक मुंशी प्रेमचंद यांची 145 वीं जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली . त्यानिमित्ताने "वारणा संवाद क्लब" ची स्थापना झाली. अंतर्गत गुणवत्ता हमी  कक्ष आणि क्लब अंतर्गत 'प्रेमचंद व्यक्ती आणि साहित्य' विषयावर भितीपत्रक विशेषांकाचे प्रकाशन आणि प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांच्या हस्ते संपन्न झाले. समारंभ संयोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कार्जीनी यांनी उपक्रमात शुभेच्छा दिल्या.

"प्रेमचंद साहित्याचे पुनर्मूल्यांकन" विषयावर बोलताना डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, महान लेखक प्रेमचंद आणि  त्यांचे साहित्य सामाजिकदृष्ट्या जागरूक होते.भारतीय समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले आहे. शंभर वर्षानंतरही आज त्यांचे साहित्य प्रासंगिक आहे. त्यांनी शोषित, पीडित, स्त्रिया, शेतकरी आणि श्रमिकांच्या जीवनातील वास्तव चित्रित करून भारतीय समाजातील विषमता उघड केली. त्यांच्या कथा-उपन्यासांतून नैतिकता, सहानुभूती, करुणा आणि न्यायाची भावना ठळकपणे दिसते.  ग्रामीण जीवनाचे विशेषता त्यांनी भारतीय खेड्यांची स्थिती, गरिबी, अंधश्रद्धा आणि संघर्ष अत्यंत वास्तवदर्शी शैलीत मांडले. आजच्या सामाजिक, आर्थिक आणि नैतिक संकटांमध्येही प्रेमचंदांचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्यांचे साहित्य आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.

yashvantrao chavan warana mahavidyalay warananagar

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. एम. शेख म्हणाले की, "शैक्षणिक क्षेत्रात  प्रेमचंद यांच्या साहित्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली आहे. त्यांचे साहित्य प्रेरणा देणारे आणि तत्कालीन परिस्थिती, समाज जीवन  आणि काळाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. शैक्षणिक वर्षाच्या आरंभी एक उत्कृष्ट उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी संयोजकांना, विभागाला धन्यवाद दिले."

स्वागत प्रास्ताविकात श्री. रवींद्र पाटील म्हणाले की, "प्रेमचंद यांचे साहित्य हे केवळ एका काळाचे प्रतिबिंब असून, ते आजच्या समाजासाठीही एक आरसा आहे. त्यांच्या लेखनात सामाजिक परिवर्तनाची ताकद आहे." यावेळी 'नॅक', समन्वयक प्रा.यु.डी. कदम, डॉ. एस.एस. जाधव, डॉ. बी.के. वानोळे, डॉ. कल्पना चारापले, प्रबंधक हरीष गायकवाड उपस्थित होते. श्रीमती गिरिजा कोकरे -देसाई यांनी आभार मानले.


  इतर बातम्या :    

Post a Comment

0 Comments