![]() |
पद्मश्री सुरेश वाडकर - सुप्रसिद्ध गायक |
कोल्हापूर/ प्रतिनिधी :
वारणानगर - कोल्हापूरच्या मातीत घडलेला एक महान कलाकार म्हणून पद्मश्री पंडीत सुरेश वाडकर यांचा सर्व कोल्हापूरकरांना विशेष अभिमान आहे. त्यांच्या बद्दलचा हाच अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंडीत सुरेश वाडकर प्रेमी ग्रुपने सुरेल संगीत मैफिल या कॅराओके मैफिलीचे आयोजन केले आहे. 7 ऑगस्ट रोजी सायं 6.00 वाजता कोल्हापूर मधील राजर्षी शाहू स्मारक भवनात ही मैफिल रंगणार आहे. या मैफिलीतून संकलित होणारा निधी समाजातील गरजुंना दिला जाणार आहे. पंडीत सुरेश वाडकरप्रेमी ग्रुपचे प्रमुख अनिल एच मोरे वं संजय सांगले यांनी ही माहिती दिली. पंडीत सुरेश वाडकर यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मैफिलीचे आयोजन करणेत आले आहे. सुरेशजींचे जन्मगांव दिंडनेर्लीचे सुपुत्र सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या हस्ते या मैफिलीचा शुभारंभ होणार आहे. यावेळी सुरेशजींचे निस्सीम चाहते सर्जेराव सांगले उपस्थित राहणार आहेत. या मैफिलीत आपल्या आवाजाने प्रति सुरेश वाडकर अशी ओळख निर्माण केलेले पद्माकर कुरकुटे,इचलकरंजी यांच्या सह व्यावसायिक व हौशी कलाकार सुरेश वाडकर यांनी गायलेली गीते सादर करत त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देणार आहेत.
या मैफिलीच्या आयोजनातून सुरेश वाडकर यांना वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा देण्या बरोबरच सामाजिक भान जपले जाणार आहब. मैफिली साठी कोणतेही प्रवेशमूल्य नाही पण जे रसिक ऐच्छिक मूल्य देतील त्यातून समाजातील गरजू लोकांना मदत केली जाणार आहे. अमित आर मेडिकल, ज्योतिर्लिंग पब्लिक स्कुल माले, एस न्यूज कोल्हापूर यांचे या मैफिलीच्या आयोजना साठी सहकार्य लाभले आहे. पंडीत सुरेश वाडकर यांच्या वर प्रेम करणाऱ्या रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या बरोबरच सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी जरूर यावे असे आवाहन या मैफिलीचे संकल्पक व आयोजक अनिल एच मोरे व संजय सांगले यांनी केले आहे.
0 Comments