वारणानगर / प्रतिनिधी : तळसंदे ता. हातकणंगले येथील विष्णू जलाशयाच्या मध्यभागी वसलेले पुरातन आणि श्रद्धास्थानी असलेले श्री विष्णू मंदिर सध्या दुरवस्थेत असून, या मंदिराच्या जतनासाठी आणि सुशोभीकरणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्या युवा आघाडीने केली आहे. यासंदर्भात सोमवार, दि. ७/७/२०२५ रोजी संघटनेच्या वतीने तळसंदे ग्रामपंचायतीकडे औपचारिक निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष महेश मोहिते यांनी यावेळी सांगितले की, “विष्णू जलाशय हे तळसंदे गावाचे सौंदर्य आणि श्रद्धेचे प्रतीक असून, त्यातील मंदिराची दिवसेंदिवस होत चाललेली पडझड ही ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावणारी बाब आहे. त्यामुळे या ठिकाणी जलदगतीने काम सुरू करण्यात यावे. यावेळी बोलताना उदयसिंह शिंदे म्हणाले, वर्षानुवर्षे या ऐतिहासिक मंदिराकडे दुर्लक्ष होत असून, आता तरी प्रशासनाने जागरूक राहून पुनरुत्थानाची दिशा घ्यावी. या मंदिराच्या जतनाबरोबरच जलाशयाचेही सुशोभीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकास साधण्याची आवश्यकता आहे.
या निवेदनप्रसंगी जय
शिवराय किसान संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामध्ये महेश विलास मोहिते, राजेंद्र वसंत शिंदे,
आनंदराव बापू पाटील, भानुदास पाटील, अमित जाधव, रोहित सुवासे, मंगेश
सुवासे, अशोक कांबळे, दीपक चव्हाण,
शरद पोवार, रवींद्र मोहिते, दिनकर चव्हाण यांचा समावेश होता. तसेच, ग्रामपंचायत
सदस्य अमित मोहिते, उदय लोहार, बाबासाहेब
पाटील, किरण मोहिते, धैर्यशील शिंदे
आणि माजी उपसरपंच महेश कुंभार या मान्यवरांचाही उपस्थिती लाभली सदरचे निवेदन
ग्रामविकास अधिकारी यांना देणेत आले. या उपक्रमामुळे गावातील ऐतिहासिक आणि धार्मिक
वारसा जपण्यास मदत होईल, तसेच भविष्यात या ठिकाणी
पर्यटनविकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व
संघटनेने व्यक्त केली आहे.
या बाबत सरपंच
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, आमदार डॉ. विनय कोरे यांच्या माध्यमातून विष्णू जलाशय सुशोभीकरण प्रस्ताव
पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पाठवला आहे यामध्ये मंदिरासह जलाशयाचे
सुशोभीकरण होणार आहे या प्रस्तावातील माहितीपट 26 जानेवारी 2025 ला ध्वजारोहण प्रसंगी ग्रामस्थांना दाखविला. लवकरच हा प्रस्ताव मंजूर
होऊन काम सुरू होईल - शुभांगी महेश कुंभार (सरपंच तळसंदे)...
0 Comments