संशोधक विद्यार्थ्यांनी डॉ.कविता कुंभार आणि प्रा. डॉ. आप्पासाहेब भुसनर लिखित "व्हईट फ्लाय इकॉलॉजी",कृषी क्षेत्राशी संबंधित पुस्तकाचे प्रकाशन करताना आमदार डॉ. विनय कोरे -सावकर. सोबत डॉ. आप्पासाहेब भुसनर, डॉ. कविता कुंभार.
वारणानगर / प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयातील संशोधक विद्यार्थिनी डॉ. कविता कुंभार -कोल्हापूर व शोध मार्गदर्शक डॉ.अप्पासाहेब भुसणार यांनी लिहिलेल्या"व्हाइट फ्लाय इकॉलॉजी" या पुस्तकाचे प्रकाशन आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांच्या हस्ते येथे संपन्न झाले. चिकमंगलुर कर्नाटक येथील इंटरेटिव्ह इंटरनॅशनल पब्लिशर या प्रकाशन संस्थेने पुस्तक प्रकाशित केले असुन या पुस्तकामध्ये मुख्यत्वे फळझाडांना प्रादुर्भाव करणाऱ्या पांढरी माशी या किडी विषयी सहा वर्षे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाचा फायदा पांढरी माशी वरती संशोधन करणाऱ्या जगभरातील संशोधकांना हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून संशोधनासाठी उपयोगात येईल तसेच फळबागा पिकविणाऱ्या जगभरातील शेतकऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून पांढरी माशीचा जीवनक्रम व फळझाडांना किडविण्याच्या पद्धतीची माहिती होईल व या माहितीच्या आधारे त्यांना या किडीचे नियंत्रण करणे सोपे जाईल. 🔴 वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||
या पुस्तकाच्या निमित्ताने देशभरातील आणि जगभरातील कृषी क्षेत्राला विशेषता मोठा फायदा होणार आहे. संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील प्रयोगशाळांचा संशोधकांना लाभ झाला. या संशोधनासाठी वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. विलास कार्जिंन्नी व प्राचार्य डॉ. प्रा. ए. एम. शेख, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी प्रकाशनां बद्दल अभिनंदन केले आहे. पुस्तकाच्या लेखिका डॉ. कविता कुंभार ह्या सध्या पंचायत समिती गडहिंग्लज येथे आरोग्य विभागाकडे कीटक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर डॉ. आप्पासाहेब भुसनर संशोधक प्राध्यापक म्हणून प्राणिशास्त्र विभागात कार्यरत आहेत.
0 Comments