वारणा महाविद्यालया मध्ये हिंदी सप्ताह निमित्त आंतरराष्ट्रीय काव्यवाचन स्पर्धा संपन्न ... | Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

 

https://www.mediapowerlive.com/ वारणा महाविद्यालया मध्ये हिंदी सप्ताह निमित्त आंतरराष्ट्रीय काव्यवाचन स्पर्धा  संपन्न ...

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये संपन्न हिंदी काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकां समवेत प्राचार्य डॉ. ए. एम. शेख, संयोजक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, डॉ. बी.के. वानोळे, डॉ. तुषार वाघमारे, डॉ मनाली सूर्यवंशी, प्रा. गिरिजा कोकरे -देसाई.

वारणानगर / प्रतिनिधी :  येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये हिंदी सप्ताह निमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय काव्यवाचन स्पर्धेला देश- विदेशातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.एम शेख होते. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ आणि यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त "वातायन" संस्था युरोप, विश्व बंधुत्व सेतू, मॉरिशियस, शिवाजी विद्यापीठ , संशोधक विचार महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आभासी माध्यमातून युरोप -लंडन स्थित ज्येष्ठ प्रवासी भारतीय साहित्यकार सुश्री दिव्य माथुर, ज्येष्ठ शताब्दी लेखक डॉ. रामदरश  मिश्र (दिल्ली), विश्वबंधुत्व सेतू, मॉरिशस च्या संचालिका कवयित्री डॉ. सुरीती रघुनंदन, युवा कवयित्री अश्विनी केगाकर- नेदरलँड आणि प्रसिद्ध कवयित्री संपादिका, डॉ. सुषमा देवी- हैदराबाद यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. 

समारंभाला श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. व्ही.व्ही.कार्जीनी यांनी शुभेच्छा दिल्या. स्वागत प्रास्ताविकात, समारंभ संयोजक प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, आज  हिंदी भाषा वैश्विक स्तरावर ती उद्योग, व्यवसाय, नोकरी रोजगार आणि तंत्रज्ञानाची, उच्च शिक्षणाची भाषा झाली आहे. प्राचार्य डॉ .शेख म्हणाले की, हिंदी भाषेला एक परंपरा असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारत देशाला एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. साहित्याला एक समृद्ध परंपरा असून उज्वल भविष्यासाठी  हिंदीतून उच्च शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. 🔴 | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

यावेळी संपन्न काव्य वाचन स्पर्धेत महाविद्यालयातील ५५ हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपल्या कविता सादर केल्या. सामाजिक आशय, राष्ट्रप्रेम, बलात्कार सारखी समस्या, नारीशक्ती नारी सन्मान, हिंदी भाषा, निसर्ग, पर्यावरण, प्रेम, माॅं, पिता, जीवन संघर्ष, आत्मसन्मान, बचपन, सत्य, किसान, जवान इत्यादी विषयांबरोबरच मोबाईल आणि ग्रंथ या सारख्या विषयांवरही कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. 

परीक्षक म्हणून डॉ .आर. एस. पांडव, डॉ. बी. के. वानोळे यांनी काम पाहिले. स्वागत प्रास्ताविक आणि कार्यक्रम संयोजन हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. संयोजन सहाय्य सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. बी. पाटील, डॉ. प्रीती शिंदे-पाटील प्रा. सौ. शिल्पा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती गिरीजा कोकरे -देसाई यांनी केले. डॉ. मनाली सूर्यवंशी यांनी आभार मानले, तंत्रसाह्य डॉ. संतोष जांभळे,डॉ. तुषार वाघमारे यांचे लाभले. आय क्यू एसी समन्वयक प्रा. उत्तम कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. 

काव्यवाचन स्पर्धेतील विजेते अनुक्रमे असे :

  • वरिष्ठ महाविद्यालय: उदय जाधव, साक्षी राऊत, अपूर्वा पाटील, रतन सुतार, अस्मिता कवारे विशेष उत्तेजनार्थ.  
  • कनिष्ठ महाविद्यालय: प्रार्थना सातवेकर, अलिशा पठाण, वैदही व्हनांगडे, सुरैया वलगे उत्तेजनार्थ. 
  • व्यवसाय अभ्यासक्रम विभाग: स्मिता जाधव, मनाली मासाळ, श्रावणी कुंभार, आर्या दास- (उत्तेजनार्थ).

वारणा महाविद्यालया मध्ये हिंदी सप्ताह निमित्त आंतरराष्ट्रीय काव्यवाचन स्पर्धा  संपन्न ... | Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

 Promoted Content : 

🔴जिद्दीने स्वप्नपूर्ती करणारे व्यक्तिमत्व - मा. श्री. विश्वास बाळासाहेब चव्हाण. | Vishwas Balasaheb Chavan | Founder of Seema Biotech Pvt. Ltd, Kolhapur |

🔴आदर्श मल्टिपर्पज सोशल असोशिएशन वारणानगर, यांचा आदर्श गौरव पुरस्कार 2024 सोहळा उत्साहात संपन्न.

🔴 वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. || 

🔴 प्रणाली पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित...

🔴 ज्येष्ठ अध्यापिका सौ. शकुंतला प्रकाश चिकुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला.

Post a Comment

0 Comments