आदर्श मल्टिपर्पज सोशल असोशिएशन वारणानगर, यांचा आदर्श गौरव पुरस्कार 2024 सोहळा उत्साहात संपन्न.


आदर्श  असोशिएशनचा  'आदर्श गौरव' पुरस्कार 2024 हा सोहळा श्री वारणा भगिनी मंडळाच्या कार्यालयात उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.

वारणानगर  (प्रतिनिधी) येथील आदर्श  असोशिएशनचा  'आदर्श गौरव' पुरस्कार 2024 हा सोहळा श्री वारणा भगिनी मंडळाच्या कार्यालयात उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. सोहळ्याचा आरंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाला.  प्रास्ताविक आदर्श चे संस्थापक श्री. सुखदेव कुंभार  यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात कुंभार म्हणाले कि' आदर्श असोसिएशन २००७ साली सुरू केले, २००७ पासून आदर्श स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम राबवत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी आपल्या असोसिएशन कडून "आदर्श गौरव" पुरस्कार देणेचे आमचे संचालक मंडळाने ठरवले , त्यानुसार आम्ही कोडोली - वारणा परिसरातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केला, यामध्ये आदर्श चा सर्वोच्च मानला जाणार  "आदर्श गौरव" पुरस्कार कु. ओंकार जितेंद्र पाटील याला देणेत येत आहे, आपल्या अपंगत्वावर मात करून शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग यशाबद्दल त्याला आमच्या असोसिएशन चा पुरस्कार देत असलेचे त्यांनी सांगितले.

           प्रस्ताविका नंतर सोहळ्याचे मान्यवर श्री वारणा विभाग शिक्षण  मंडळ वारणानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. विलास व्ही. कारजिन्नी, पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वर्ग क्रमांक 1 च्या मा. सोनाली माडकर यांचे आदर्शचे संचालक मा.श्री. भगवान पाटील व विजय उगळे यांनी मान्यवरांचे  स्वागत  केले. या स्वागत सोहळ्या नंतर  शैक्षणिक वर्ष  2023-24 मधे इयत्ता दहावी अकराव्या आणि बारावी मधे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आणि  गणित विषयांमध्ये शंभर पैकी 100 मार्क मिळवलेल्या निलेश श्रीकृष्ण लाड व ईश्वरी धनंजय गिरी या विद्यार्थ्यांना रुपये दहा हजारचा धनादेश देऊन गौरवान्वित करण्यात आले. तसेच  एम.ए.सेट,नेट च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, गुणवत्तेच्या बळावर शासनाची फेलोशिप मिळवलेल्या आणि सध्या पीएच.डी. मध्ये संशोधन करीत असलेल्या  कोडोली येथील  दिव्यांग युवक ओंकार पाटील याला आदर्श गौरव देणेत आला , यावेळी शाल, श्रीफळ आणि 11 हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भावपूर्ण मनोगत व्यक्त करताना ओंकार म्हणाला की माणसाच्या मनामध्ये जिद्द असेल  आणि माणूस मनाने खंबीर असेल तर कोणतेही ध्येय प्रयत्न आणि कष्टाने प्राप्त करू शकतो. मला देखील नेटच्या परीक्षेमध्ये दोन वेळा अपयश आल्या नंतर यश मिळाले आहे. या प्रसंगी आदर्श असोसिएशनचे  संचालक श्री.  विजय उगळे यांनी आपला चिरंजीव वरद याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नी सौ. गुणाली  आणि बंधू अमोल यांच्या सोबत ओंकार पाटील यांना पाच हजार रुपये सद्भावना भेट म्हणून प्रदान केले. 

          मान्यवरांच्या मनोगतामध्ये प्रमुख पाहुण्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वर्ग क्रमांक 1  मा. सोनाली माडकर विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या, "जीवनामध्ये ध्येय ठरवताना प्लॅन बी सुद्धा तयार ठेवा जेणेकरून प्लॅन ए मध्ये अपयश आले तर प्लॅन बी च्या वाटेने जाऊ शकता. एमपीएससी मध्ये वर्षातून 200 ते 300 जागा भरायच्या असतात आणि लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात तथापि एम.पी. एस. सी.  मध्ये सिलेक्शन नाही झाले तरी निराश न होता  आपल्या अभिरुची आणि क्षमतेप्रमाणे करिअरच्या नव्या वाटा शोधा. अभ्यास करत असतानाच आपले विविध छंद देखील जोपासा."


           अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री वारणा शिक्षण प्रसार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ.श्री. विलास कारजिन्नी म्हणाले, "डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या पलीकडे सुद्धा आर्किटेक्चर, फार्मसी, एग्रीकल्चर, डिझायनिंग असे अनेक पदवीचे कोर्सेस आहेत या कोर्सेस मध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थी उज्वल  करिअर करू शकता. आदर्शने ज्ञानदानाचा दर्जा आणि सेवा टिकवून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे याचा अभिमान वाटतो असे उदगार त्यांनी या प्रसंगी बोलताना काढले. विद्यार्थी दशेमध्ये गुरूंचे महत्त्व विशद करून सोहळ्याचे आभार  आदर्शचे संचालक मा.श्री. भगवान पाटील यांनी मानले. सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कुलकर्णी यांनी केले.

तर या सुंदर सोहळ्याचे संयोजन  सचिव श्री. चिंतामणी कुंभार व त्यांच्या सर्व सहकारी यांनी केले. या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी वारणा  आणि पंचक्रोशीतील शुभेच्छुक उपस्थित होते.


 Promoted Content : 

🔴 वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

🔴 प्रणाली पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित...

🔴 ज्येष्ठ अध्यापिका सौ. शकुंतला प्रकाश चिकुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला.

🔴 | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

Post a Comment

0 Comments