ओंकार जितेंद्र पाटील यांना
'आदर्श गौरव' पुरस्कार
-आदर्श मल्टीपर्पज सोशल असोसिएशनतर्फे होणार सन्मान.
वारणानगर (प्रतिनिधी) : येथील आदर्श मल्टीपर्पज सोशल असोसिएशन वाराणानगर तर्फे देण्यात येणारा वर्ष 2023 - 24 साठीचा 'आदर्श गौरव' पुरस्कार कु. ओंकार जितेंद्र पाटील यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. आर. कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. कुंभार म्हणाले, ओंकार जितेंद्र पाटील यांनी अपंगत्वावर मात करत एम.ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर नेट व सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यापुढे जाऊन सध्या ते पीएच.डी. करत आहेत. अपंगत्वावर मात करत शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी घेतलेली ही गरुड झेप युवकांसाठी प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना 'आदर्श गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. रोख 11,000 रुपये, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
24 जुलै 2024 रोजी श्री, वारणा भगिनी मंडळ कार्यालय या ठिकाणी सकाळी 11 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. डॉ. विलास व्ही. कारजिन्नी मुख्य कार्यकारी अधिकारी - श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर यांच्या अध्यक्षतेखाली व सोनाली माडकर गटविकास अधिकारी वर्ग - १ पंचायत समिती पन्हाळा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री. चिंतामणी कुंभार यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सर्व संचालक उपस्थित होते.
Promoted Content :
🔴 वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||
🔴 प्रणाली पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित...
🔴 ज्येष्ठ अध्यापिका सौ. शकुंतला प्रकाश चिकुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला.
0 Comments