प्रणाली पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित
कोडोली (प्रतिनिधी) : येथील सौ. प्रणाली प्रवीण पाटील, औषध निर्माण अधिकारी, बोरपाडळे प्राथमिक
आरोग्य केंद्र यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी दिला जाणाऱ्या
राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ
यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाहू जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील महासैनिक
दरबार येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा अधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची
प्रमुख उपस्थिती होती.
सौ.
प्रणाली पाटील ह्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बोरपाडळे
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सध्या कार्यरत आहेत. त्यांनी आज पर्यंत रत्नागिरी
व कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात
वाडी लिंबू ता. लांजा जिल्हा
रत्नागिरी, माण ता. शाहुवाडी, केखले ता. पन्हाळा, सावर्डे ता. हातकणंगले
या ठिकाणी वीस वर्षे सेवा बजावली आहे. जिल्हा परिषद विकास
कामांच्या विविध योजना राबविताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महत्त्वाचा असतो. कर्मचार्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा व पुढील काम करण्यास
प्रोत्साहन लाभावे म्हणून जिल्हा परिषदेकडून राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार दिले
जातात. कर्मचाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करताना त्यांचे गोपनीय अहवालातील अति
उत्कृष्ट शेरे, समय सुचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णय शक्ती, नियमांचे ज्ञान सामाजिक
व शैक्षणिक कला गुण सचोटी व प्रामाणिकपणा इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात.
सौ
पाटील यांनी औषध निर्माण अधिकारी म्हणून वरील सर्व ठिकाणी काम करत असताना अतिशय
उत्कृष्ट पद्धतीने काम केले आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना
अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून चांगल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्र मिळाले
आहे. त्यांचे औषध भांडार नेहमी सुसज्य असते तसेच ई प्रणाली औषध मध्येही त्यांनी
अतिशय उत्कृष्ट असे काम केले आहे. याबद्दल त्यांना वेळोवेळी भेट देणाऱ्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी चांगल्या कामाबद्दलचे शेरे दिले आहेत. याबरोबरच त्यांना
समाजकार्याची मोठ्या प्रमाणात आवड असून वारणेचा वापर होण्याची माध्यमातून त्यांनी
अनेक सामाजिक कामात सहभाग नोंदविला आहे. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये व
त्यांना वेळेत औषधोपचार मिळावे यासाठी कायम त्या तत्पर असतात.
कोरोना काळात
त्यांनी सुमारे १५० पेशंट बरे केले . येथील काही पेशंट असे होते की त्यांचे
कुटुंबीय ही त्यांच्या जवळ जात नसत. अशावेळी आपले कर्तव्य व मानवता म्हणून स्वतःची
पर्वा न करता त्यांनी ही सेवा बजावली. त्यामध्ये त्यांनाही रोगाचा प्रादुर्भाव
झाला. परंतु बरे होऊन पुन्हा त्या कामास त्यांनी स्वतःला जुंपून घेतले. व्यक्तीला
जीवनात अनेक पुरस्कार मिळतात. तथापि लोकराजा राजश्री शाहू छत्रपती यांच्या नावाने
मिळणार पुरस्कार अनमोल आहे. त्यांना या कामी अनेकांचे सहकार्य लाभले याबरोबरच
पुरस्कार मिळाल्याबद्दल कोडोली परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Promoted
Content :
🔴 वारणा
खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||
🔴 हरितक्रांतीचे प्रणेते कै.श्री. बापूसाहेब जमदाडे (तात्या). माले
🔴 गरूड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे. (वाडीरत्नागिरी)
🔴 | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)
0 Comments