कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy

कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा आणि सहकाऱ्यांचा सत्कार करताना आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) 

वारणानगर / प्रतिनिधी : 

कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रम सुरु करणारं पाच जिल्ह्यातील पहिलं महाविद्यालय श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून फार्म. डी. व बी. फार्मसी (प्रॅक्टिस) या दोन नवीन अभ्यासक्रमांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांचेकडून मान्यता नुकतीच मिळाली. ‘रुग्णांशी प्रत्यक्षात संपर्कात राहून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण महाविद्यालयात आणि कृतीशील प्रशिक्षण अध्ययावत महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये देण्याचं काम फार्म. डी. अभ्यासक्रमाअंतर्गत होणार’ असं प्रतिपादन डॉ विनय कोरे (सावकर साहेब) यांनी केले.    

फार्म. डी. म्हणजेच डॉक्टर इन फार्मसी हा ६ वर्षाचा अभ्यासक्रम असून पहिली ५ वर्षे नियमित अभ्यासक्रम, हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षण आणि अंतिम वर्ष इंट्रंनशिप असे त्याचे स्वरूप आहे. सदर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीधरांना फार्मसी क्षेत्रामध्ये क्लीनिकल रिसर्च ऑफिसर; हेल्थकेअर हॉस्पिटल,  क्लीनिकल, कम्युनिटी, ड्रग इन्फॉमेशन फार्मासिस्ट; क्वॉलिटी सर्व्हिस, न्यू ड्रग डेव्हलपमेंट, मेडिकल इन्फॉर्मेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ड्रग रेग्युलेटरी ऑफिसर; मेडिकल ॲडव्हायझर, मेडिकल रायटर अँड पब्लिशर, फार्माकोव्हिजीलन्स ऑफिसर, पब्लिक हेल्थकेअर,प्रोजेक्ट लीडर, मेडिकल इन्शुरन्स ॲडव्हायझर, ॲकॅडमीशियन, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर, मेडिकल मार्केटिंग रिसर्चर अशा करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

बारावी विज्ञान उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यास पात्र असून एम्.एच्.टी. सीईटी एंट्रन्स परीक्षेतील मार्कांच्या आधारे केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत.  Tatyasaheb Kore College of Pharmacy 

बी. फार्म. (प्रॅक्टिस) हा २ वर्षाचा कोर्स असून डिप्लोमा इन फार्मसी झालेल्या आणि कम्युनिटी किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये कमीत कमी ४ वर्ष अनुभव असलेल्या रजिस्टर्ड फार्मासिस्टना त्यांची शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे. सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर कम्युनिटी फार्मासिस्ट, एक्सटेंडेड केअर फॅसिलिटी, मानसोपचार केंद्र, रेग्युलेटरी एजन्सी, होलसेल आणि रिटेल व्यवसाय, हॉस्पिटल फार्मसी इत्यादी क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असणार आहेत.

सदर अभ्यासक्रमांच्या मान्यता मिळवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, प्रा. विनय बागल,  डॉ. अमोल शेरीकर, डॉ. उज्वला चौगुले, श्री सागर घोडके आणि श्री सचिन कट्टीमनी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली 

 Promoted content : 

🔴  कृषि दिनानिमित्त आ.डॉ. विनय कोरे (सावकर) यांची खास मुलाखत.

🔴  SAHAKAR MAHARSHI LATE SHRI V.A. ALIAS ​​TATYASAHEB KORE वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे.

🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे |Biography| of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

Post a Comment

0 Comments