ज्येष्ठ अध्यापिका सौ. शकुंतला प्रकाश चिकुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला.


 

तळसंदे, ता. :  येथील कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत विकास विद्यामंदिर शाळेच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ. शकुंतला प्रकाश चिकुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ विस्तार अधिकारी एस. के. बोरचाटे, केंद्रप्रमुख बाबासाहेब सिद, अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी - प्राथमिक विभाग सौ. एम. एन. शेंडकर, हातकणंगले पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. जगन्नाथ पाटील, कार्यालयीन प्रबंधक प्रभाकर मिरजे-अण्णा,  हुपरी येथील शिक्षक मित्र धनाजी शेवाळे, ज्येष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक  श्री. शंकरराव चिकुर्डेकर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

                 सौ. शकुंतला चिकुर्डेकर यांनी गेली ३३ वर्षाहून अधिक काळ हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली, तळसंदे, केंद्र शाळा पारगाव, चांदोली वसाहत, तर शाहूवाडी तालुक्यातील आरूळ इत्यादी शाळांमधून प्रामाणिक सेवा बजाविल्याबद्दल केंद्रशाळा, केंद्रांतर्गत येणाऱ्या तेरा शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, अध्यापिका, तळसंदे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. शुभांगी महेश कुंभार, उपसरपंच संतोष सुवासे, शाळा समितीचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण, आनंदराव चव्हाण(बापू), उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग श्री. शिवाजी मानकर, केंद्र मुख्याध्यापक शिवाजी चौगुले, मुख्याध्यापक श्री. सदाशिव पाटील यांच्या हस्ते मानपत्र, फेटा, शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन पति प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर (वारणानगर) सह उभयतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज्य शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ शिक्षक नेते सर्वश्री शिवाजी रामचंद्र पाटील,एन. वाय. पाटील, राजमोहन पाटील, अरुण चाळके, मधुकर पाटोळे, आप्पा पाटील -आरुळकर,सौ. चिकुर्डेकर यांच्या विद्यार्थिनी एडव्होकेट सौ. अस्मिता शिंदे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, अध्यापिका, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामस्थ, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सौ. चिकुर्डेकर म्हणाल्या की,"आयुष्यभर प्रामाणिक सेवा केल्याबद्दल समाजाने दखल घेतल्याचा आनंद होत आहे."

            यावेळी कागल येथील 'सुर संगम करा ओके' ग्रुपने हिंदी- मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक बशीर पटाईत यांनी तर सूत्रसंचालन सौ. सायली तांबवेकर बाबासाहेब वरपे यांनी केले. मानपत्राचे वाचन सौ.विजयालक्ष्मी गायकवाड यांनी केले. संयोजन साह्य. प्रमिला भुशिंगे, यांच्याबरोबरच राजकुमार, संजय, वाल्मिकी, विजय, अजय जाधव, विलास व श्रीकांत चिकुर्डेकर,शितल फोटोचे सागर, सौ. आरती, पंकज चिकुर्डेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांचे प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी आभार व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments