महाविद्यालय कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करताना वक्ते प्रा.डॉ.प्रकाश कुंभार, प्राचार्य डॉ. ए. एम. शेख. सोबत प्रा.डॉ. राजकुमार पांडव, प्रा. यू.डी कदम.
वारणानगर / प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेचा विषय "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० समजून घेतांना, होता अग्रणी महाविद्यालय कार्यक्षेत्रातील पंधराहून अधिक महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रकाश कुंभार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पार्श्वभूमी व विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन विशद केला, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोण कोणत्या बाबतीत जागरूक असायला हवं याच सखोल मार्गदर्शन करून ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नोकरीक्षम माणूस घडवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आले असून शिक्षण आणि संशोधना ला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण शोध आवश्यक आहेत. शिक्षण विद्यार्थ्यांच्या पर्यंत सहज पोहोचवणे, जीवन घडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा महाविद्यालय स्तरावर ती विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चांगला वाईट परिणाम होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याची सोय असून एकाच वेळेला दोन पदवी, एकाच वेळेला संयुक्त पदवी, प्रत्यक्ष अनुभव आणि कौशल्यावर शिक्षण दिली जाणार आहे. शैक्षणिक धोरण समाजातील आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ए .एम. शेख यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे मल्टिपल एन्ट्री, मल्टिपल एक्झिट, मल्टी डिसिप्लिनरी ऍप्रोच, असे अनेक पैलू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना गुणांच्या बरोबर आता कला आणि कौशल्याचेही क्रेडिट प्राप्त होणार आहेत. मध्येच सुटलेली शिक्षण पुन्हा सुरू करता येणार आहे असे ते म्हणाले. सदर कार्यशाळेत वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनय रावजी कोरे सावकर साहेब व प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ. राजकुमार पांडव यांनी केले. कार्यशाळेत विविध अग्रणी महाविद्यालयातून शंभरहून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. यू.डी कदम, डॉ. आर. पी. कावणे, प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्रा. डॉ. आर. बी. पाटील, डॉ. शितलकुमार देसाई, प्रा. अविनाश पाटील यांचे सहकार्य लागले लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी खुजट यांनी केले आभार डॉ. रोहित बसनाईक यांनी मानले.
Promoted Content :
🔴 वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||
🔴 प्रणाली पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित...
0 Comments