📍 कोल्हापूर | दि. २९ जुलै
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची महाराष्ट्र शासनातर्फे वारणानगर येथील नव्याने स्थापन झालेल्या वारणा समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. आज विद्यापीठ कार्यालयास अधिकृत आदेश प्राप्त झाला.
नियुक्तीनुसार, डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ ते पदभार स्वीकारलेल्या दिनांकापासून एक वर्ष किंवा कायमस्वरूपी कुलगुरू पदग्रहण होईपर्यंत (जे आधी होईल) लागू असेल. सध्या शिवाजी विद्यापीठातील त्यांच्या कार्यकाळात ते वारणा विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. त्यानंतर ते पूर्णवेळ कुलगुरू म्हणून कार्यरत होतील.
डॉ. शिर्के यांचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव अत्यंत समृद्ध आहे. यापूर्वी त्यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून काम पाहिले असून, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणूनही कार्य केले आहे.
🗣 मातृसंस्थेसाठी काम करण्याची संधी : डॉ. शिर्के यांची भावना
“वारणा समूह विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. कारण माझे पदवीपूर्व शिक्षण याच संस्थेत झाले. आता मातृसंस्थेतील सेवा पूर्ण करून, पुन्हा याच संस्थेसाठी कार्य करण्याची संधी मिळणे याचा मनस्वी आनंद आहे,” असे डॉ. शिर्के यांनी नमूद केले.
✅ ही बातमी “Media Power Live” यांच्याकडून सर्वप्रथम तुमच्यापर्यंत!
📌 अधिक अपडेटसाठी आमचं पेज आणि यूट्यूब चॅनेल फॉलो करा –
#MediaPowerLive | #KolhapurNews | #ShivajiUniversity | #warnaUniversity | #VinayKore | #VilasKarjinni
0 Comments