कोडोली (प्रतिनिधी) :
कोडोली येथे मातृदिनानिमित्त आईबद्दलचे प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने ‘आईसोबत सेल्फी’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची घोषणा प्रशांत बुगले यांनी केली असून परिसरात या उपक्रमाची उत्सुकता वाढली आहे.
प्रशांत बुगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या आईसोबत एक सेल्फी काढून त्या फोटोला आकर्षक आणि भावनिक कॅप्शनसह सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. तसेच संबंधित पोस्ट prashant_bugale_official या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटला टॅग अथवा कोलॅब करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकणार असल्याने युवकांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्कृष्ट फोटो आणि भावनिक कॅप्शनच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून:
🥇 प्रथम क्रमांक: ₹७००१
🥈 द्वितीय क्रमांक: ₹५००१
🥉 तृतीय क्रमांक: ₹३००१
ही स्पर्धा दि. ९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होऊन दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मातृदिनानिमित्त आईबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्कासाठी खालील क्रमांक जाहीर केले आहेत:
📞 मनोज तराळ – ७४९९३१५३२९
📞 महेश पाटील – ८६६९५३५२५३
अजून वाचा 👇 :
📰 पन्हाळ्यातील नायब तहसीलदार संजय वळवी यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ पुरस्कार
📰 ABP शिक्षण समूह मध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा
📰 कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
📰 वारणानगर येथे ‘व्हिजन 2026’ गौरव सोहळा; UPSC यशवंतांचा भव्य सत्कार | Surajya Foundation

0 Comments