यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू राधिका कळंत्रे हिने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ब्रांझ पदक प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन करताना प्राचार्य डॉ .प्रकाश चिकुर्डेकर , सोबत क्रीडा संचालक अण्णासो पाटील, समन्वयक प्रा. नितीन कळंत्रे.
वारणानगर/ प्रतिनिधी :
यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू कुमारी राधिका शिवलिंग कळंत्रे हिने सॉफ्टबॉल मध्ये ब्रांझ पदक पटकाविले. औरंगाबाद येथे झालेल्या २८ व्या सीनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर संघाने गटातील दोन सामने जिंकून पुढील फेरीच्या सामन्यात लातूर जिल्हा संघावर २-१ गुणाने मात केली. तर उप उपांत्य फेरीच्या सामन्यात सांगली जिल्हा संघावर १-० अशा फरकाने विजय मिळवून, उपांत्य फेरीच्या सामन्यात जळगाव मनपा संघाकडून १-० असा पराभव स्वीकारला. तृतीय क्रमांक साठी झालेल्या सामन्यांमध्ये पुणे शहर संघावर १-० अशा फरकाने विजय मिळवून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच राधिका हिने आतापर्यंत राजस्थान, वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे या स्पर्धा औरंगाबाद येथे २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर येथे पार पडल्या.
तिच्या या यशाबद्दल वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी अभिनंदन केले. क्रीडा संचालक प्रा. आण्णासो पाटील, क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 🔴यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मोहरे, ता.पन्हाळा येथे पार पडले...
प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली
Promoted content :
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित.
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न.
🔴 कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy
🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे |Biography| of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)
0 Comments