वारणेत प्रथमच २०२३ पासून दिला जाणार श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तृत्व सन्मान २०२३ चा पुरस्कार जाहीर....

वारणेत प्रथमच २०२३ पासून दिला जाणारा श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तुत्व सन्मान २०२३ चा पुरस्कार जाहीर....

श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तृत्व सन्मान २०२३ च्या मानकरी.

वारणानगर/ प्रतिनिधी :  

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वारणेच्या आईसाहेब श्रीमती शोभाताई कोरे स्त्री कर्तुत्व सन्मान महाविद्यालयाच्या तीन माजी विद्यार्थिनींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल जाहीर झाला आहे. यानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन ही करण्यात आले आहे. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे-सावकर यांच्या प्रेरणेने आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली समारंभाचे संकल्प संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी घोषणा करताना सांगितले की, अंबपवाडी ता. हातकणंगले येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुमारी अमृता जाधव यांनी दिवाणी न्यायाधीश आणि न्याय दंडाधिकारी पदी पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. जिल्ह्यात पहिल्या आणि राज्यात १४ व्या येण्याचा मान त्यांनी प्राप्त केला.

पाडळी तालुका हातकणंगले येथील तृप्ती मुळीक या सध्या सिंधुदुर्ग पोलीस मध्ये कार्यरत असून महाराष्ट्र पोलीस विशेष पथकातून त्यांनी गत वर्षात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्या गाडीचे सारथ्य केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी घटना घडली. त्याचे देशभर कौतुक झाले. तर कोडोली, तालुका - पन्हाळा येथील कोमल ढोले या सध्या दापोली येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असून मे २०२२ मध्ये रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्याला अचानक लागलेल्या आगीत जीवाची परवा न करता पोलीस स्टेशनच्या छतावरती चढून सहकाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे अतुलनीय धाडस दाखवले.

या तीनही विद्यार्थिनींनी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षण घेऊन खेळ, क्रीडा राष्ट्रीय छात्र सेना विभागातही चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी देशभर, राज्यभर झालेल्या गुणगौरवात वारणा महाविद्यालय आणि वारणा नगरीतून मिळालेल्या ध्येयाच्या आणि संस्कारामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. या सन्मानार्थ त्यांना "श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तुत्व सन्मान : २०२३ पुरस्कार" देऊन गौरविण्यात येत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा संदर्भ ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. 

विशेष म्हणजे तरुण वयात कार्य करत असणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करून त्यांना समाजाप्रती जिद्दीने काही उच्च कामगिरी करण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठीच पुरस्काराचे प्रयोजन असल्याचे पुरस्कार समितीचे संकल्पक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न होणार असून वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. स्नेहा निपुणराव कोरे आणि शोभाताई कोरे महिला पत संस्थेच्या अध्यक्षा सौ.शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच समारंभात प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते शोभाताई कोरे आईसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा, आचार-विचार संस्कारांचा, वारसा पुढे चालवणाऱ्या "आईसाहेब आम्ही चालवू हा पुढे वारसा", या प्रेरणेने 'स्त्री कर्तृत्व सन्मान', गौरव म्हणून आई साहेबांच्या सुनुषा सौ. स्नेहा -वहिनी कोरे आणि सौ. शुभलक्ष्मी वहिनी - कोरे यांचा हि विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमचे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक भवनामध्ये ०८ मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.

Yashwant-charitable-hospital-Shri-yashwant-prasarak-mandal-kodoli-maharashtra
                         प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली 

 Promoted content :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शेअर बाजारातील संधी, समज व गैरसमज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.

🔴 महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

🔴 व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित. 

Post a Comment

0 Comments