महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न / Maharashtra-High-School-Junior-College-Kolhapur-Maharashtra

महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न / Maharashtra-High-School-Junior-College-Kolhapur-Maharashtra
 

कोल्हापूर /प्रतिनिधी : 

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर संचलित महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर या शाळेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा पार पडला. या समारंभामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, शाळांतर्गत व शाळाबाह्य स्पर्धा व इ. १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती उदयास आली. या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. राजर्षी शाहू महाराजांनी मोफत व सक्तीची शिक्षण पद्धती महाराष्ट्रात सुरू केली. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले तरच बहुजन समाज प्रगत होईल याचा विचार करून शिक्षण पद्धती सुरू केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सुभाष चौगुले यांनी व्यासपीठावर आल्यावर शाहूंचा विचार यशस्वी झाला याची जाणीव झाली असे सांगितले. महाराष्ट्र हायस्कूलने गेली 63 वर्ष ज्ञानार्जनाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली. यातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास निश्चितपणे होतोय याची प्रचिती या कार्यक्रमातून आली असे प्रतिपादन मा.सुभाष चौगुले सहाय्यक शिक्षण संचालक, कोल्हापूर यांनी केले.

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र हायस्कूलने मारलेली गरुड भरारी ही कोल्हापूरला भूषणीय आहे. सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, पैलवान युवराज पाटील, वीरधवल खाडे यासारखे विविध खेळात यश मिळवणारे खेळाडू तयार करण्याचे सामर्थ्य महाराष्ट्र हायस्कूलच्या भूमीत आहे. ज्या भक्तीभावाने तुम्ही मंदिर, चर्च, मशीद येथे जाता. त्याच आत्मीयतेने वाचनालयात व ग्रंथालयात जावा यश नक्कीच मिळेल. यश अशक्य नाही त्यासाठी प्रयत्नशील बना, या प्रयत्नाच्या जोरावरच तुम्ही आपल्या शाळेचे नाव राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री के.जी.पाटील होते.  

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथ, रांगोळी, चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन मा.सुभाष चौगुले व डॉ. जी. पी. माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ज्या शिक्षकांनी विविध खेळात यश मिळविले अशा सर्व  क्रीडाशिक्षकांचे सत्कार या कार्यक्रमावेळी करण्यात आले. शालेय विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एस.एस. पाटील, संस्था परिचय संचालक श्री विनय पाटील तर या कार्यक्रमाचे वार्षिक अहवाल वाचन उप-प्राचार्य श्री यु.आर. अतकिरे सर यांनी केले.

संस्थेचे व्हा. चेअरमन डी.जी. किल्लेदार, खजिनदार वाय.एस.चव्हाण, संचालक पी.के. पाटील, आर.डी. पाटील, सौ. सविता पाटील, आजीव सेवक सी.एम.गायकवाड, पर्यवेक्षक जे.पी.कांबळे, एस.ए.जाधव, माजी प्राचार्य व्ही.बी.लोहार, ए.एस. रामाणे, माळकर सर, शाळेचे आजी माजी शिक्षक, विद्यार्थी व पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. मोरे, सौ. आर.आर. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री उदय पाटील यांनी मानले. 


 Promoted content :  

🔴 व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित. 

🔴 वारणा महाविद्यालयातील राधिका कळंत्रे हिला राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन 

Post a Comment

0 Comments