S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

वारणानगर येथे वारणा विद्यापीठ अंतर्गत अंतरराष्ट्रीय कवी संमेलन व काव्यवाचन स्पर्धा | Warana University

	Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar

वारणानगर येथील वारणा विद्यापीठ अंतर्गत हिंदी आंतरराष्ट्रीय काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांसमवेत प्राचार्य डॉ. ए.एम. शेख व प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर.

वारणानगर / प्रतिनिधी   - 

येथील वारणा विद्यापीठ अंतर्गत यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयांमध्ये वारणा संवाद क्लब आणि हिंदी विभागाच्या वतीने आयोजित अंतर विद्यापीठ, अंतरराष्ट्रीय कवी संमेलन आणि काव्यवाचन स्पर्धेत देश- विदेशातील शंभर हून अधिक लेखक, कवी साहित्यिकार आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. संयोजक महाविद्यालया बरोबरच तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण महाविद्यालय आणि औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही विशेष सहभाग नोंदवीला. हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी संयोजन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.एम.शेख होते. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, वारणा विद्यापीठाचे नूतन कुलाधिकारी एन.एच. पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. डी.टी. शिर्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजीनी यांनी समारंभासाठी शुभेच्छा दिल्या.

नागरी लिपी परिषद ऑस्ट्रेलिया, नागरी लिपी परिषद नवी दिल्ली, रुसी राज्य मानव्यविद्या विद्यापीठ मास्को- रशिया, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संशोधक विचार महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद यांच्या विशेष सहकार्याने अंतर्जालीय माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ रोपट्याला पाणी देऊन झाला. स्वागत प्रास्ताविकात बोलताना समारंभ संयोजक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, "उच्च शिक्षणाचे माध्यम आता हिंदी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाषेची असणारी भीती आता बाळगू नये. हिंदी भाषा भारतीय संस्कृती, परंपरा आणि एकात्मतेची प्रेरणा देते. भाषेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना देशातच नव्हे तर जगभरात उद्योग, व्यवसाय आणि नोकरी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत."

अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. शेख म्हणाले की, हिंदी एक मधुर भाषा असून हिंदी भाषेला एक परंपरा आहे. हिंदीच्या माध्यमातून आपले विचार, भावना आणि आदर्शांचे व्यापक रूप आपण जगासमोर मांडू शकतो. यावेळी आभासी माध्यमातून कवयित्री डॉ. सुनिता शर्मा (ऑस्ट्रेलिया), साहित्यकार डॉ. रत्नाकर नराले (कॅनडा), लेखिका प्रा. डॉ. इंदिरा गाजिएवा (मास्को- रशिया), लेखिका ममता तिवारी (बहरीन), डॉ. हरिसिंह पाल (नवी दिल्ली),कवयित्री डॉ. कवितासिंह 'प्रभा' (मेरठ), डॉ. मुक्ती शर्मा (आनंतनाग- कश्मीर) याचबरोबर मास्को रशिया मानव्यविद्या विद्यापीठातील 'हिंदी भाषा विज्ञान' विभागातील विद्यार्थिनी अनास्तासिया बुर्दा, अनास्तासिया शितिकोवा, एलिना जव्यागिन्त्सेवा, वरवरा शेर्बाकोवा, मार्गारीटा एर्माल्युक, एलेना शाख या अतिथी कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

हिंदी भाषा, समाज, शिक्षण, राजकारण, देशभक्ती, पर्यावरण, नारीशक्ती, युवाशक्ती, भारतीय शेतकरी मजूर इत्यादी विषयावरच्या रोचक कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या. परीक्षक म्हणून डॉ. बी.के. वानोळे, डॉ. आर. एस. पांडव यांनी पाहिले. समारंभ यशस्वी करण्यासाठी डॉ. आर. बी. बसनाईक, प्रा. गिरीजा कोकरे -देसाई, प्रा.रवींद्र पाटील, डॉ. प्रीती शिंदे- पाटील,प्रा. शिल्पा पाटील, प्रा. वर्षा रजपूत, प्रा. दिपाली पाटील यांनी विशेष सहकार्य केले. 

स्वागत प्रास्ताविक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. आभार प्रा. गिरीजा कोकरे-देसाई यांनी मानले.

स्पर्धेतील विजेते अनुक्रमे असे :
🟢 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय: वरिष्ठ विभाग -पार्वती कामी, मनाली हिरवे, साक्षी राऊत, अस्मिता कवारे.

🟢कनिष्ठ -प्रार्थना सातवेकर, आयुष महाजन, वेदिका पांढरबळे,श्रेया पाटील.

🟢किमान कौशल्य विभाग -दिव्य भंडारी, नम्रता गाडे, श्रावणी कुंभार,यशवर्धन मोरे.

🟢तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय: वैष्णवी पाटील, सायली डांगे, वैष्णवी चौगुले.

🟢तात्यासाहेब कोरे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय:निखिल काळे, सिद्धी पंडित, कृषी पाटील, श्रुती कांबळे, संदीप जाधव.

 इतर बातम्या :    

Post a Comment

0 Comments