![]() |
वर्षा व्याख्यानमालेचे दिप्रज्वलनाने उद्घाटन करताना वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव , वक्ते गुरूवर्य भालचंद्र पाटील, शिवाजी जंगम, उत्तम चव्हाण, रमाताई काशीद आदी... |
सध्याचे मानवी जीवन अत्यंत दुःखी,कष्टी, नैराश्यमय, वेदनादायी, बनले असून यावर मात करण्यासाठी विज्ञान सुद्धा आज अपुरे पडत असल्यामुळे जीवनात खऱ्या अर्थाने सुख, शांती,आणि आत्मिक समाधान मिळवायचे असेल तर आपल्या अवतीभवती काही आध्यात्मिक अदृश्य शक्ती वास करीत असतात याचाही अभ्यास करणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी प्रतिपादन केले ते वारणानगर येथील वर्षा व्याख्यानमालेत उद्घाटनाचे पहिले पुष्प गुंफताना बोलत होते.
वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिर आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेचे उद्घाटन वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते झाले. उपस्थितांचे स्वागत ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी केले. याप्रसंगी वारणा दुध संघाचे संचालक शिवाजीराव जंगम , उत्तम चव्हाण , रमाताई काशीद,प्रमोद कोरे ,के.जी जाधव ,जयसिंग पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी या वर्षा व्याख्यानमालेचे हे ४७ वे वर्ष असून पहिले पुष्प गुंफताना " गुरूचरित्रातून गुरूआज्ञा " या विषयावर बोलताना मोराळे पेड येथील दत्त देवस्थानचे गुरूवर्य भालचंद्र पाटील बोलताना पुढे म्हणाले की मानवी जीवन सुखी समृद्ध होण्यासाठी मद्यपान आणि मांसाहार वर्ज करून गुरुचरित्राचे अवलोकन प्रत्येकाने करायला पाहिजे. भक्ती आणि नामस्मरणाच्या जोरावर दिव्य कृपा व दिव्यप्राप्ती मिळवता येते...पापाचा नाश होऊन षडविकारावर विजय मिळवता येतो... यासाठी गुरूचरित्रातील गुरू आज्ञचे आचरण करणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गुरूवर्य भालचंद्र पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन आणि पाहुण्यांचा परिचय राजेंद्र कोळेकर यांनी करून दिला.
या कार्यक्रमास, दिनकर शेटे, सभाष शिंदे, आबासाहेब शिंदे, राहुल शिंदे, एम बी मलमे, जयसिंग पाटील, राजाराम पाटील, आदींसह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक ,अधिकारी ,विद्यार्थी, शिक्षक ,महिला,शिवदत्त परिवारातील सेवेकरी आदींसह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments