यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शेअर बाजारातील संधी, समज व गैरसमज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन..Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananaga


वारणानगर येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलताना प्रा. डॉ. केदार मारुलकर. सोबत प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, डॉ. आर. एस. पांडव, प्रा .आर. बी. बसनाईक, डॉ . सी. आर. जाधव.

वारणानगर/ प्रतिनिधी :  

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत "शेअरबाजार संधी : समज व गैरसमज" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातील प्रा. डॉ. केदार मारुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. कार्यशाळेत श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना डॉ. मारूलकर म्हणाले की," शेअरबाजाराकडे एक संधी म्हणून पहावे,  अभ्यासपूर्वक दीर्घकालीन गुंतवणूक करावी. शेअरबाजाराकडे बघताना फक्त गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून न बघता एक करिअर संधी म्हणून बघावे. आज शेअर बाजार मध्ये अनेक प्रकारच्या करियर संधी निर्माण झाल्या आहेत, या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. ब्रोकर, ऍनालिस्ट, सल्लागार, पोर्टफोलिओ मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, म्युचल फंड डिस्ट्रीब्यूटर आणि विमा सल्लागार याचा समावेश होतो. लोभ व भीती यावर मात करणे आवश्यक आहे.", असेही ते म्हणाले. 

 अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी, "शेअर बाजारामध्ये कोणत्याही अमिषाला बळी न पडता, स्वतः अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी, विद्यार्थ्यांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आवश्यक शिक्षण ,ज्ञान व अनुभव घेतला पाहिजे. आई-वडिलांना ही सांगा आणि आपणही शहाणे होऊन, कष्टाचा पैसा असाच भूलथापांना बळी न पडता कुठेही गुंतवू नका", असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यशाळेस पन्हाळा, करवीर, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यातील १५ हून अधिक महविद्यालया मधून २५० हून अधिक विद्यार्थिनी, प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रारंभी स्वागत प्रा. डॉ. राजकुमार पांडव यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. रोहित बसनाईक यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रवीण सातवेकर त्यांनी केले. अग्रणी कार्यशाळा संयोजनामध्ये प्रा. अविनाश लाडगांवकर, प्रा. कु. सुप्रिया कांडगावकर यांनी सहभाग नोंदविला. डॉ.चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.


 Promoted content :  

🔴 महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

🔴 व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित. 

🔴 वारणा महाविद्यालयातील राधिका कळंत्रे हिला राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक.

Post a Comment

0 Comments