राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मा. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे. सोबत प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर, सरपंच शिवाजीराव मोहिते, आदिनाथ नलावडे, उपसरपंच प्रदीप डोईफोडे, कार्यक्रमाधिकारी डॉ.सी.आर. जाधव उपस्थित होते.
वारणानगर/ प्रतिनिधी :
यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मोहरे, (तालुका पन्हाळा) येथे विविध उपक्रमानी उत्साहात संपन्न झाले. शिबिरासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रो. डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. शिबिराचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ. सी.आर. जाधव, डॉ. आर. पी. कावणे यांनी काम पाहिले. शिबिरात १०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी रस्ते स्वच्छता, गटारींची स्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, जनावरांचा दवाखाना परिसर स्वच्छता, दुरुस्ती, पानंद रस्ते दुरुस्ती, स्मशानभूमी स्वच्छता आणि ग्रामपंचायत परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या विहीर परिसराची स्वच्छता इत्यादी श्रमदानाची कामे केली.
![]() |
| श्रमसंस्कार शिबिरात स्वच्छता करताना स्वयंसेवक |
बौद्धिक संपदा वृद्धीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्यासाठी consumer guidance society of india, मुंबई या संस्थेच्या मार्फत "वित्तीय साक्षरता आणि ग्राहक जागृकता" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत १०० स्वयंसेवक आणि २०० पेक्षाही जास्त ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून "सेबी" च्या वतीने डॉ. भक्ती मूलचंदानी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, "आपण आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा बचत केला पाहिजे, आणि केलेली बचत शेअर्स व मॅच्युअल फंड मध्ये गुंतवली पाहिजे तरच आपल्या पैशात वाढ होईल." consumer guidance society of india, मुंबई या संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर सौ. मिलन मिस्त्री यांनी 'ग्राहक जागरूकता', या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या उत्पादक अनेक वेळा ग्राहकांना फसवतात. दूध, धान्य यामध्ये विक्रेते भेसळ कशी करतात. ती ओळखता आली पाहिजे, त्यासाठी त्यांनी दूध भेसळीची चित्रफीत, वाटाणा आणि तोंदली अशा भाज्यांना दिला जाणार हिरवा रंग याच्या चित्रफिती दाखविल्या, अशा तक्रारी आपण ग्राहकपाल यांच्याकडे कशी करू शकता हेही सांगितले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रा. शिवाजीराव मोहिते, उपसरपंच श्री प्रदीप डोईफोडे आणि प्रा. एम. जी. चिकलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबिरामध्ये सात दिवसात श्रमदान, स्वच्छतेबरोबरच दुपारच्या सत्रात स्त्री पुरुष समानता काळाची गरज, डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुलांचे जीवन चांगले होते आहे काय, आजची शिक्षण पद्धती आणि वित्तीय साक्षरता या विषयावरील चर्चासत्रे ही संपन्न झाली. चर्चासत्रात अनुक्रमे प्रा. प्रवीण सातवेकर, डॉ. सर्जेराव जाधव, प्रा. विकास पाटील, डॉ. एस.एस. खोत यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग नोंदविला.
शिबिराचा समारोप समारंभ प्राचार्य डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. जिल्हा परिषद सदस्य श्री शिवाजीराव मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव मोरे बोलत होते, ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमामुळे श्रमाची गोडी वाढली आहे. युवकांचा ग्रामीण विकासातील सहभाग वाढत आहे. "प्राचार्य डॉ.प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, "श्रमसंस्काराच्या माध्यमातून विद्यार्थी खऱ्या अर्थाने संस्कारी घडत असून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार शिबिरामुळे शिस्त, धैर्य, आत्मविश्वास निर्माण झाला आहे. स्वयंसेवकांना सात दिवसाच्या शिबिर अनुभवाची शिदोरी पुढील आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरेल." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सात दिवसाच्या शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून हर्षदा पाटील, हर्षदा काटकर आणि रोहित पाटील यांची निवड करण्यात आली. स्वयंसेवक कोमल शिंदे, तेजस घेवारे, अभिजीत माळी, हर्षदा काटकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
शिबिरात १०० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये मुलींची संख्या ७१ तर मुलांची संख्या २९ होती. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि समन्वयक डॉ. सी.आर.जाधव, डॉ. आर. पी. कावणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. डॉ. पी. एस. आहुजा, सौ. डॉ. पी. आर. साळोखे, प्रा. दिनेश पाटील यांच्या उपस्थितीत आणि संयोजन सहाय्य श्री आदिनाथ नलावडे, दीपक नलवडे यांच्या बरोबरच मोहरे गावातील विविध दूध संस्था, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक, सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते यांच्या विशेष सहकार्यातून शिबिर संपन्न झाले. तर शिबिरात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देऊन स्वयंसेवकांचा आत्मविश्वास वाढविला.
Promoted content :
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित.
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न.
🔴 कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy
🔴 कृषि दिनानिमित्त आ.डॉ. विनय कोरे (सावकर) यांची खास मुलाखत.
🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे |Biography| of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)
_2.jpeg)
_1.jpeg)
_0.jpeg)
.jpeg)
0 Comments