वारणा - कोडोली परिसरामध्ये दीपावली महोत्सव |Deepawali Festival|

 कोडोली / प्रतिनिधी : 

यशस्वी फौडेशनच्या वतीने १४ ते १ ९ ऑक्टोबर या कालावधीत कोडोली येथील दत्त मठीक्रीडांगणावर यशस्वी दिपावली महोत्सव आयोजन केले असल्याची माहिती यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी व यशस्वी फौंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दि. १४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या दरम्यान ग्रामीण भागातील लोकांच्या उद्योगाला चालना मिळण्यासाठी वारणा कोडोली परिसरामध्ये भव्य दिव्य दिपावली महोत्सव - २०२२ चे आयोजन केले आहे. सदर महोत्सवामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्हातील अनेक कलाकारांनी निर्माण केलेले विविध हस्तनिर्मित वस्तु, लघु उद्योग, महिला गृह उद्योग, विविध नामवत कंपन्यांचे उत्पादित साहित्य, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ, शेतासाठी उपयुक्त माहिती व उत्पादने , महिला बचत गट यांनी बनवलेले विविध वस्तू व विक्रीचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. 

या स्टॉल मुळे सर्वांना खुली बाजारपेठ मिळणार आहे, शिवाय एकाच छताखाली ग्राहक वर्गालाही विविध वस्तू उपलब्ध होणाच्या मार्ग असणार आहे. दरम्यानच्या प्रदर्शनामध्ये आकर्षक हेल्मेट रेडा लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी दिपावली महोत्सव प्रदर्शन व विक्री मध्ये भेट देऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अभिजित इंगवले यांनी केले, सोबत उपस्थित पुंडलिक पाटील, संतोष पायघन,  मंदार पसरणीकर, ग्रेस गायकवाड, वैशाली पोवार, भारती साळोखे, स्वाती बावणे, सोनाली नेमिष्टे, सरिता पाटील, अजिंक्य मोरे, किरण जाधव,  श्री .नलवडे व फौंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्टॉल बुकींगसाठी संपर्क :

यशस्वी सोशल वेलफेअर फौंडशेन
दत्त मठी रोड, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर -४१६११४ 

'Sureshot Events Management Pvt. Ltd.'

Mobile No : 91 9970070470 / 91 9049318198

 Promoted Content :