यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटील ने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रौप्य पदक मिळवल्याबदल तिचे अभिनंदन करताना आमदार डॉ. विनय कोरे (सावकार), क्रांतीकुमार पाटील, विश्वास जाधव, दादा बच्चे, व इतर सहकारी.
वारणानगर/ प्रतिनिधी :
वारणानगर, ता. येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का सयाजी पाटील हिने राजकोट गुजरात येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत वरिष्ठ जलतरण स्पर्धेत लगेच ४X१०० मिटर फ्री स्टाइल रिले क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.
कुमारी अनुष्का पाटील ही महाविद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र शाखेकडे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रातून मुंबई येथील अवंतिका चव्हाण, पलक जोशी आणि दिव्या पंजाबी यांच्या सहकार्याने अनुष्काला यश प्राप्त झाले आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ वासंती रासम, प्रभारी प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर यांनी कुमारी अनुष्का पाटील च्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून पालकांसह अनुष्का चे अभिनंदन केले आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा अण्णासो पाटील क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करताना कुमारी अनुष्का पाटील म्हणाली की बेंगलोर येथे जलतरण स्पर्धेसाठीचे विशेष प्रशिक्षण घेणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ती महाराष्ट्र आणि देशासाठी भरीव कामगिरी करण्याची इच्छा आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून वडील शिक्षक आहेत या कामकाजासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे असेही ती म्हणाली.
0 Comments