HOTEL RENUKA

HOTEL RENUKA
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती सप्ताह विविध उपक्रमाने संपन्न झाला. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar

yashwantrao-chavan-warana-mahavidyalaya-YCWM-Warananagar-Kolhapur-maharashtra

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी सप्ताह निमित्त आयोजित सत्कार्य संवर्धक मंडळ पुरस्कृत सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या समवेत  प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, सोबत संयोजक डॉ. ए. आर.भूसणर, डॉ. एस. एस. खोत,प्रा. डी.ए.खोत, प्रा.एस.एस. लाड, प्रा. शिल्पा पाटील, डॉ. सी. आर. जाधव, प्रा. आण्णासो पाटील, डॉ. संतोष जांभळे, प्रा. यु.आर. पाटील व सहकारी प्राध्यापक.

वारणानगर / प्रतिनिधी :

वारणानगर, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये 'महात्मा गांधी जयंती सप्ताह ' उत्साहात साजरा करण्यात आला.  जयंती दिनानिमित्त महाविद्यालय आणि सत्कार्य संवर्धन मंडळ,  यांच्या संयुक्त विद्यमाने 'आंतवर्गीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा', राष्ट्रीय छात्र सेना आणि सेवा योजना च्या वतीने परिसर स्वच्छता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे विशेष सहकार्य लाभले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे हे २६ वे वर्षे होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रश्नमंजुषा स्पर्धेचे समन्वयक डॉ. आप्पासाहेब भुसनर यांनी प्रास्ताविक व स्वागतपर मनोगतात प्रश्नमंजुषा स्पर्धेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, उद्देश, हेतू, उपयुक्तता व समकालीन प्रसंगीकता स्पष्ट केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना चिकुर्डेकर म्हणाले की,"महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, आणि जगापुढे 'अहिंसा परमो धरमो' चा आदर्श निर्माण केला. तर भारताचे माजी पंतप्रधान श्री. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' चा नारा देऊन श्रमशक्तीचा गौरव केला. या दोन्ही महापुरुषांना व त्यांच्या विचारांना आदर्श म्हणून आपण जीवनयापन करायला पाहिजे.  पर्यायाने एक सशक्त भारत निर्मितीसाठी गांधी आणि शास्त्रीच्या विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले. पंचवीस वर्षांपूर्वी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागातील कष्टकरी मजूर आणि शेतकरी मुलांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे या उदात्त हेतून स्पर्धा सुरू केल्याचे ते म्हणाले. आजची प्रश्नमंजुषा स्पर्धा ही विद्यार्थ्यांना उद्याच्या स्पर्धेसाठी सशक्त बनवणारी आहे. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास निर्माण करणारी व तो अधिकाधिक वृद्धिंगत करणारी आहे. स्पर्धा म्हटली की यश अपयश हे आलेच परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे स्पर्धेमध्ये सहभागी होणे आहे. तेव्हा स्पर्धेतील यश - अपयशाला सकारात्मक दृष्टिकोनाने पहा, भावी आयुष्यात स्पर्धेत यश तुमचेच आहे. यावेळी  प्रा. के. जी. जाधव  उपस्थित होते ते म्हणाले,"सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे जीवनात असामान्य यश प्राप्त करण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांनी टाकलेले पहिले पाऊल आहे.

yashwantrao-chavan-warana-mahavidyalaya-YCWM-Warananagar-Kolhapur-maharashtra
सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी उपस्थित स्पर्धक.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत वरिष्ठ, कनिष्ठ व एचएसव्हीसी. विभागातून एकूण १८ संघाअंतर्गत ७२ हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला, तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत इतिहास, अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, क्रीडा, मिक्स बॅग, रॅपिड फायर अशा गटांतर्गत संबंधित विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश होता. प्रा. उमेश जांभोरे यांनी स्पर्धेतील विजेत्या संघांच्या नावाची घोषणा केली. तर सर्व विजेत्यांना प्राचार्य प्रो. डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. प्रा. उमेश जांभोरे यांनी स्पर्धेतील विजेत्या संघांच्या नावाची घोषणा केली, तर सर्व विजेत्यांना प्राचार्य प्रो. डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.  

'Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar'

स्पर्धेतील विजेते संघ अनुक्रमे असे -

प्रथम क्रमांक : बी.एस्सी. भाग ३ -
कु. सानिका सरदार चौगुले (कदम), कु. सानिका संभाजी भोसले, कु. अदिती अशोक भोसले.
द्वितीय क्रमांक : बी.कॉम. भाग २ -
कु. निकिता विश्वनाथ सूर्यवंशी, कु. सोनाली अनिल पांगे, कु. नम्रता संभाजी शिंदे, कु. ऋतुजा धनाजी नाईक.
तृतीय क्रमांक : १२ वी वाणिज्य -
कु. समृद्धी विकास भोसले, आर्या अमर जाधव, साहिल निपुण परीट, सुयश बाजीराव सूर्यवंशी.
उत्तेजनार्थ  क्रमांक : १२ वी विज्ञान -
कु. दीक्षा मोहन गिड्डे, कु. निलाक्षी निवास माने, कु. सानिका संदीप भोसले, कुमारी नंदिनी प्रशांत पाटील.

स्पर्धेचे संयोजन समन्वयक डॉ. आप्पासाहेब भुसनर यांनी केले. तर प्रा. एस.एस. लाड (सह-समन्वयक), डॉ. एस.एस. खोत, डॉ. डी. डी. सातपुते, प्रा. आण्णासो पाटील, प्रा. डी. ए. खोत, डॉ. सी.आर. जाधव, प्रा. उमेश जांभोरे,  प्रा. यू. आर. पाटील, डॉ. संतोष जांभळे, प्रा. दिपाली पाटील, प्रा. माधुरी खुजत, प्रा. सावित्री ठोंबरे, प्रा. क्रांतिसिंह पाटील इ. संयोजन समिती सदस्य व क्विझ मास्टर होते. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम्' गीताने झाली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.संतोष जांभळे व  प्रा. शिल्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. एस. एस. खोत व प्रा. यू. आर. पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.



 Promoted Content : 

Post a Comment

0 Comments