HOTEL RENUKA

HOTEL RENUKA
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना दिन मोठ्या उत्साहात संपन्न... /Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)

yashwantrao-chavan-warana-mahavidyalaya-YCWM-Warananagar-Kolhapur-maharashtra

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये आयोजित "एनसीसी डे" निमित्त अंडर ऑफिसर सौरभ चव्हाण यांचा सत्कार करताना कर्नल अमरसिंह सावंत. सोबत प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, कॅप्टन सुधाकर खोत आणि सहकारी अधिकारी. 

वारणानगर/ प्रतिनिधी :

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्रसेना दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल अमरसिंह सावंत उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर होते. कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विनय कोरे सावकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासकीय अधिकारी प्रोफेसर वासंती रासम आणि कर्नल विजयंत थोरात, ५६ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना, कोल्हापूर यांचे प्रोत्साहन लाभले. 

यावेळी कर्नल सावंत म्हणाले की, "आपला वेळ आणि आपली ऊर्जा योग्य कामासाठी कारणी लावल्यास जीवनातील कोणतेही आव्हान कठीण जाणार नाही. आजच्या तरुणाईला शिस्त लावण्याचे आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे उत्कृष्ट काम राष्ट्रीय छात्रसेना पार पाडीत आहे. राष्ट्रीय छात्रसेना या जगातील सर्वात मोठ्या गणवेशधारी संघटनेचे सभासद असल्याबद्दल आपणा सर्वांना अभिमान असला पाहिजे. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, "सहकार महर्षि तात्यासाहेब कोरे यांच्या स्वप्नातील नवा आदर्श माणूस घडविण्याचे कार्य राष्ट्रीय छात्रसेना अखंडपणे पार पाडत आहे. याप्रसंगी तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, कॅप्टन सुधाकर खोत, लेफ्टनंट जयंती गायकवाड, एनसीसी अधिकारी सेकंड ऑफिसर आर. एस. पाटील, किरण रोकडे, भीमराव मोरे, किशोर घुगे, काळजीवाहू एनसीसी अधिकारी रणजीत नाईक उपस्थित होतेYashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)  

या कार्यक्रमांमध्ये वारणा संकुलातील वारणा विद्यालय, कोडोली हायस्कूल, पाराशर हायस्कूल आणि तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी या शाळेतील ६०० हून अधिक छात्रसैनिक सहभागी झाले होते.  यावेळी राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय थल सेना कॅम्प, नवी दिल्ली मध्ये सहभागी झालेले छात्रसैनिक सीनियर अंडर ऑफिसर जय देसाई आणि स्वरूपा घाटगे, शिवाजी विद्यापीठाची कॅप्टन ए.ए.जाॅर्ज शिष्यवृत्ती प्राप्त सौरभ चव्हाण आणि  उत्कृष्ट कामगिरी केलेल्या इतर छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय सैन्य भरती प्रक्रियेमध्ये अग्निवीर पदी महाविद्यालयातून निवड झालेल्या ओंकार कांबळे, संग्राम पाटील, अनिकेत पाटील आणि सब-इन्स्पेक्टर (केंद्रीय राखीव पोलीस दल) पदी नियुक्ती मिळालेल्या ओंकार कराळे या छात्रसैनिकांचा अभिनंदन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत कॅप्टन सुधाकर खोत यांनी केले. सेकंड ऑफिसर किरण रोकडे यांनी आभार व्यक्त केले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील छात्रसैनिक साहिल चौगुले, श्रेयस माने, ऋषिकेश ठोके, प्रिती धेटे, शिवानी वर्मा आणि प्रिती निरवणेकर यांनी सूत्रसंचालन केले.


 Promoted content : 

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये व्यवसाय अभ्यासक्रम, कला विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित  

🔴 कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy

🔴  कृषि दिनानिमित्त आ.डॉ. विनय कोरे (सावकर) यांची खास मुलाखत.

🔴 ऊसतोड कामगार ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन : सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

🔴  SAHAKAR MAHARSHI LATE SHRI V.A. ALIAS ​​TATYASAHEB KORE वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे.

🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे |Biography| of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

Post a Comment

0 Comments