यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये जी-२० परिषद आणि पर्यावरण जनजागृती यावरती ऑनलाईन वेबिनार. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये  जी-२० परिषद आणि पर्यावरण जनजागृती यावरती ऑनलाईन वेबिणार पार पडला. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)
जी-२० परिषद आणि पर्यावरण जनजागृता यावरती ऑनलाईन वेबिनारमध्ये बोलताना डॉ. मकरंद ऐतवडे. सोबत प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, लेफ्टनंट डॉ. एस.एस. खोत, लेफ्टनंट प्रा. जयंती गायकवाड  
 

वारणानगर/ प्रतिनिधी : 

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी, कोल्हापूर आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'जी-२० परिषद आणि पर्यावरण जनजागृती', या विषयावरील ऑनलाईन वेबिनारला विद्यार्थी एनसीसी, कॅडेट आणि तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूर विभाग एनसीसी मधील विविध महाविद्यालयातील छात्रसैनिक, एनसीसी अधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही सहभाग नोंदवला.  प्रारंभी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम  यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर  होते. कार्यक्रमात स्वागत प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, 'जी -२० परिषद हे विविध देशांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करणारे महत्त्वाचे संघटन असून, यावर्षी जी- २० ची अध्यक्षता भारताकडे आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताला जगाचे नेतृत्व करण्याची या निमित्ताने ही संधी मिळाली असून ही एक ऐतिहासिक घटनाआहे. "एक पृथ्वी एक कुटुंब", या घोषवाक्या खाली संपूर्ण जगाला पौष्टिक आहार, सुरक्षित अन्न पुरवठा आणि निसर्गला अनुकूल शेतीला प्रेरणा देणे या तीन महत्त्वाच्या गोष्टी वरती जगभर काम सुरू आहे. या निमित्ताने अवाजवी भौतिक आणि रासायनिक उपकरणांचा मानवी जीवनात वापर झाल्याने संपूर्ण मानव जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळे जी - २० च्या माध्यमातून 'वसुधैव कुटुंबकम्' या आशयाभोवती विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून  महाविद्यालयाने पर्यावरण जनजागृतीसाठी एक दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, 'मानवाला चीर शाश्वत विकास करावयाचा असेल तर पर्यावरण रक्षण  अत्यंत आवश्यक आहे." 

प्रमुख मार्गदर्शक आणि वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांनी 'पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वत रांगांमधील जैवविविधता, त्याचे महत्त्व, पर्यावरणासमोरील  विविध प्रश्न आणि  उपाय योजना' यावर विस्तृत मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षणामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी अनेक ऐतिहासिक दाखले दिले. भारतीय संस्कृतीमधील पूर्वापर चालत आलेल्या परंपरा, प्लास्टिक ऐवजी द्रोण पत्रावळींचा वापर, देवराईंचे राखीव जंगल, वनौषधी, वनसंपदा आणि जाणता राजा छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र याचे विवेचन केले. भगवान श्रीकृष्णांची तुला करताना, 'तुळशी पत्राने प्रत्यक्ष भगवंताची तुला करता येते' हे सांगून वनस्पतींचे महत्त्व विशद केले. मानवाची इतर प्राण्यांची तुलना करताना त्यांनी सांगितले की 'इतर प्राणी स्वतःमध्ये निसर्गानुरुप बदल घडवतो.  याउलट, माणूस मात्र स्वतःसाठी पर्यावरणाचा ऱ्हास करून पर्यावरणाला परावर्तित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करावयाचे असल्यास निसर्गाशी एकरूप होणे आणि त्या पद्धतीने आपली जीवन पद्धती बदलणे अनिवार्य असल्याचे' सांगून ते म्हणाले पुढे म्हणाले की," देवराई जंगलांचे पौराणिक महत्त्व आजही  धार्मिक आणि पौराणिक असले तरी ते पर्यावरण पूरकच आहे.  बदलत्या जीवनशैलीतून देवराईचे अस्तित्व कायम ठेवणे मनुष्य जातीसाठी आवश्यक असून पश्चिम घाट प्रदेशात पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात डोंगराळ जंगली भागात माणसाच्या बेफिकीर वृत्ती मुळे आग लागून  वनवा पेटण्याच्या घटना चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन कॅप्टन डॉ. सुधाकर खोत आणि लेफ्टनंट सौ. जयंती गायकवाड यांनी केले. ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे प्रशासकीय अधिकारी कर्नल विजयंत थोरात आणि ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी कोल्हापूर चे कमांडींग ऑफिसर कर्नल श्रीनिवासन गणपती यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी लेफ्टनंट डॉ. सुधाकर खोत यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला आणि  तांत्रिक संयोजन केले. सहसंयोजिका लेफ्टनंट सौ. जयंती गायकवाड यांनी सहभागींचे आभार मानले.   


    हे हि वाचा :             

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव.

🔴 ग्रामपंचायतने जादा कर घेतल्यास तक्रार कुठे करता येते ? Excessive tax collection complaint of Gram Panchayat.

🔴 वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान. solar panel


Post a Comment

0 Comments