रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. / Rotary Club of Kolhapur Sunrises

रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; सुसज्ज ब्लड बँक उभारण्याची घोषणा केली

रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. /  Rotary Club of Kolhapur Sunrises

रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

वारणानगर \ प्रतिनिधी : 

रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर  गेली पाच वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.या ग्रामसेवा केंद्राच्या वतीने सुसज्ज ब्लड बँक उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करु अशी ग्वाही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सेक्रेटरी रोटेरियन डॉ.भरत कोटकर यांनी दिली. ते ग्रामसेवा केंद्राच्या 2023-2024 या वर्षासाठीच्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळयात बोलत होते.यावेळी  सनराईजचे मावळते प्रेसिडेंट ऋषीकेश खोत, ग्रामसेवा केंद्राचे गार्डीयन रोटेरियन विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या समारंभात ग्रामसेवा केंद्राचे नूतन  प्रेसिडेंट संदीप रोकडे,सेक्रेटरी प्रकाश सूर्यवंशी यांनी पदाची सूत्रे स्विकारली.नूतन सदस्य आशिष पाटील आणि जतिनराज जगताप यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.विविध क्षेत्रात उल्लेखनिय यश मिळवलेले ग्रामसेवा केंद्राचे सदस्य प्रविण पाटील,जयदीप पाटील,विशाल बुगले,प्रा.शिवदत्त उबारे यांना सन्मानित करण्यात आले.मावळते प्रेसिडेंट कृष्णात जमदाडे यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर केला. नूतन प्रेसिडेंट संदीप रोकडे आणि आणि सेक्रेटरी प्रकाश सूर्यवंशी यांनी ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात जोतिबा डोंगर परिसरात एक भक्त एक झाड या संकल्पनेतून व्यापक वृक्षारोपण करणे,ओपन जिम,लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड , स्पर्धा परीक्षा अभ्यासिका , दर महिन्याला आरोग्य तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,अवयव दान जनजागृती यां सारखे उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले.या समारंभात बोलताना रोटरी ग्रामसेवा केंद्राचे गार्डीयन युवा उद्योजक रोटेरियन विशाल जाधव म्हणाले, ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून येत्या वर्षभरात सुसज्ज ब्लड बँक उभारणे, दिव्यांगांसाठी पतसंस्था सुरू करणे, पन्हाळगड संवर्धन  असे  विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजने त्यासाठी सहकार्य करावे.ब्लड बँक उभारणीसाठी आपल्या वडीलांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त भरीव निधी देऊ.  रोटेरियन डॉ.भरत कोटकर यांनी  ग्रामसेवा केंद्राच्या  ब्लड बँक उभारणीसाठी सनराईजच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यासह ग्रामसेवा केंद्राच्या प्रस्तावित उपक्रमांच्या पूर्ततेसाठी मदत करण्याची ग्वाही दिली . रोटेरियन ऋषीकेश खोत यांनी ग्रामसेवा केंद्राने गेल्या वर्षभरात राबवलेल्या समाजहिताच्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामसेवा केंद्राचे सेक्रेटरी प्रकाश सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रा.धनंजय गिरी यांनी सूत्रसंचलन केले तर जयदीप पाटील यांनी आभार मानले.या समारंभाला ग्रामसेवा केंद्राचे सर्व सदस्य उपस्थित होेते.



  हे हि वाचा : 

➦ गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

➦ राज कीय क्षेत्रात दादा  म्हणून संबोधले जाणारे मा. अजितदादा  पवार. / Biography of ajit dada pawar 

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "जागतिक पर्यावरण दिन", विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments