वारणानगर येथील वारणा महाविद्यालयाच्या शालेय विभागीय क्रिकेट क्रीडा स्पर्धेस निवड झालेल्या खेळाडू तन्मय लट्टे शिवराज मुगडे व शरण्या रजपूत कस्तूरी कदम यांचा सत्कार करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्हि.व्हि. कार्जीन्नी सर महाविद्यालयाचे प्रार्चाय डॉ.ए. एम. शेख सर महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. क्रांतीकुमार पाटील श्री. सुहास कंदुरकर किकेट प्रशिक्षक विशाल पाटील, सागर चव्हाण, प्रितीश पाटील, सावकर चव्हाण आदी
वारणानगर / प्रतिनिधी : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर मधील खेळाडू यांची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापुर च्या वतीने सन २०२४-२५ मधील जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेस आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेतून १९ वर्षाखालील मुलांच्या वयोगटातील कु तन्मय अमोल लट्टे (११ वी सायन्स) व कु. शिवराज सावनकुमार मुगडे (११ वी सायन्स) तसेच १९ वर्षा खालील मुलींच्या वयोगटातील शरण्या सुर्यकांत रजपूत (११ वी सायन्स) व कस्तूरी शिवाजी कदम (११ वी सायन्स) यांची दि. ७ ते ९ डिसेंबर २०२४ रोजी मेरी वेदर ग्राउंड, होमगार्ड ऑफीस शेजारी, कसवा वावडा रोड, कोल्हापुर येथे होणा-या विभागस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेस निवड झाली आहे त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन...
विजयी खेळाडूना श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्हि. व्हि. कार्जीन्नी महाविद्यालयाचे प्रार्चाय डॉ. ए. एम. शेख सर यांचे प्रोत्साहन मिळाले व महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. क्रांतीकुमार पाटील श्री. सुहास कंदुरकर क्रिकेट प्रशिक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
0 Comments