टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे आयोजन...
कोल्हापूर/ प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टाटा मोटर्स, पुणे येथे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची ही उत्तम संधी असून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी २६ मार्च २०२५ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी केले आहे. मुलाखतीचे आयोजन सकाळी 9 वाजता संजय घोडावत आय.टी.आय. विभाग, अतिग्रे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय.टी.आय. विभागाचे प्राचार्य प्रा. स्वप्निल थिकने, अविनाश पाटील, सुजित मोहिते आणि इतर संपूर्ण स्टाप विशेष मेहनत घेत आहेत. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिस कामाचे आयोजन करण्यात आले आहे.
आय.टी.आय. पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी व सध्या दुसऱ्या वर्षामध्ये मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, पुणे येथे अप्रेंटीस साठी सुवर्णसंधी.......
इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करून 26 मार्च रोजी सकाळी ९ वाजता संजय घोडावत आय. टी.आय. मध्ये मुलाखतीसाठी उपस्थित रहावे
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/2MhtJPM6RR8dEGFEA
अधिक माहितीसाठी संपर्क : 9158593377, 8378993579, 8275449505
मुलाखतीसाठी पत्ता - संजय घोडावत आय. टी. आय. अतिग्रे, ता- हातकणंगले, जि - कोल्हापूर
इतर बातम्या :
0 Comments