![]() |
कृत्रिम बुद्धिमता विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र वितरण करताना प्राचार्य डॉ. ए. एम. शेख. सोबत कार्यशाळा संयोजक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्रमुख पाहुणे डॉ. कबीर खराडे, डॉ. प्रकाश मुंज. |
वारणानगर / प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये शिवाजी विद्यापीठ परिस्पर्श योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) भाषा आणि नॅक मूल्यांकन प्रक्रियेवर नाविन्यपूर्ण परिणाम, या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. कबीर खराडे आणि हिंदी विभागातील प्रा. डॉ. प्रकाश मुंज उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ए.एम. शेख यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यशाळेचे संयोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांना सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या जीवन कार्यावरील 'मी एक कार्यकर्ता' ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेसाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे -सावकर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ. कबीर खराडे यावेळी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवन सुखकर होईल. भविष्यात मानवी जीवनाच्या भावना मोजणीची क्षमता विकसित करण्याचे काम ही याच माध्यमातून होत आहे. शैक्षणिक संस्था, त्यांची शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्ता वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून संस्था आपला दर्जा सुधारू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या अचूक गुणवत्तेचे मूल्यांकन 'नॅक'च्या माध्यमातून होईल त्याच्यासाठी महाविद्यालयांनी, संस्थानी सज्ज आणि सजग राहण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
कार्यशाळेसाठी जयसिंगपूर, कोंडीग्रे, हातकणंगले,वाठार, कोडोली, मलकापूर- येलूर महाविद्यालयातील प्राध्यापक निमंत्रित होते. यावेळी प्रा. तुषार वाघमारे, प्रा. अमोल काळे यांनी प्रतिक्रिया देऊन कार्यशाळा उपयुक्त आणि यशस्वी झाल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. आर.बी. बसनाईक, डॉ. रणजीत लिधडे, डॉ. प्रीती शिंदे - पाटील, प्रा. शिल्पा पाटील, डॉ. राजकुमार पांडव, डॉ. सचिन पुजारी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गिरिजा कोकरे - देसाई यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.मनाली सूर्यवंशी यांनी केले. 'नॅक' समन्वयक प्रा. उत्तम कदम यांनी आभार मानले.
![]() |
0 Comments