कोल्हापूर, दि. ३० (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे निर्माण झालेल्या पुरवठा अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅसचा शंभर टक्के घरपोच पुरवठा करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना दिले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत एजन्सीकडे जाऊन गॅस घ्यावा लागणार नाही. शंभर टक्के घरपोच वितरण हीच प्रणाली प्रभावीपणे राबवावी. तसेच कुठेही अवैध विक्री किंवा ब्लॅकमार्केटिंग होणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्ससाठी उपलब्धतेनुसार गॅस वितरण करण्याबाबत चर्चा झाली. सध्या व्यावसायिक गॅसचे २० टक्के वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती कंपन्यांनी दिली. पुढील काळात उपलब्धतेनुसार हा पुरवठा वाढविण्याचेही संकेत देण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकाला घरगुती गॅस सिलेंडर शंभर टक्के घरपोच मिळालाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ब्लॅकमार्केटिंग किंवा अनियमित पुरवठा सहन केला जाणार नाही. — जिल्हाधिकारी अमोल येडगे
औद्योगिक क्षेत्रे व मोठ्या आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस पुरवठा (PNG) देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यासाठी महानगरपालिकांशी समन्वय साधून आवश्यक परवानग्या देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
तसेच कामगार व परप्रांतीयांसाठी ५ किलोच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित कंपन्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की,
👉 बुकिंगशिवाय गॅस वितरण
👉 ओटीपीशिवाय सिलेंडर देणे
👉 ब्लॅकमार्केटिंग
अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, गॅस घरपोच मिळत असल्याने एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये. नियोजित वेळेनुसारच गॅस वितरण केले जात आहे.
अजून वाचा 👇 :
📰 स्व. केदार पाटील यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम...
📰 जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांना अडचण नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0 Comments