यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शनिवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाच्याआंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन.
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)
वारणानगर/ प्रतिनिधी :
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन पद्धतीने हिंदी विषयाच्याआंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, हिंदी विभाग,भारत सरकार उच्च शिक्षण विभाग यांच्या सहयोगाने कार्यरत असणाऱ्या केंद्रीय हिंदी संस्था आग्रा, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "वर्तमान हिंदी साहित्य वैचारिक स्थिती", या विषयावर अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे -सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ .वासंती रासम आहेत. अधिवेशनाचे संयोजन शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे समन्वयक, संशोधक मार्गदर्शक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले आहे.
अमेरिका स्थित 'विश्वा', आंतरराष्ट्रीय मासिकाचे संपादक प्रसिद्ध व्यंग्य लेखक रमेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथील संस्थानच्या अध्यक्षा, लेखिका, संशोधक डॉ. बीना शर्मा अध्यक्षस्थानी आहेत.चीन येथील विदेशी भाषा विद्यापीठातील प्रा. संशोधक, अभ्यासक डॉ. विवेकमणी त्रिपाठी, जपान येथील 'गूंज', मासिकाच्या संपादिका आणि भारत- जपान सांस्कृतिक कार्य समन्वयाच्या अध्यक्षा श्रीमती रमा शर्मा, कोल्हापूर-शिवाजी विद्यापीठाचे पूर्व अध्यक्ष आणि हिंदीतील वरिष्ठ साहित्यकार, समीक्षक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण, अंदमान- पोर्ट ब्लेअर येथून प्रा. डॉ. एन. लक्ष्मी, केंद्रीय हिंदी संस्था केंद्र, हैदराबाद येथील विभागीय अध्यक्ष डॉ. गंगाधर वानोडे आणि प्रसिद्ध लेखिका संपादिका डॉ. सुषमादेवी, प्रा. डॉ . सुनील बनसोडे यांच्यासह देश-विदेशातून ५०० हून अधिक संशोधक, प्राध्यापक, लेखक, पत्रकार सहभागी होणार आहेत.🔴वारणा महाविद्यालयातील राधिका कळंत्रे हिला राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक.
अधिवेशनाच्या तयारीसाठी विविध समित्या कार्यरत असून प्रा.डॉ.एस. एस. खोत, प्रा.डॉ.संतोष जांभळे विशेष कार्यरत आहेत. तरी निःशुल्क आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाचा हिंदी प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले आहे.
Promoted content :
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित.
🔴 वारणा महाविद्यालयातील राधिका कळंत्रे हिला राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक.
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न.
🔴 कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy
🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे |Biography| of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)
0 Comments