जुने पारगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जुने पारगाव (ता. हातकणंगले) प्रतिनिधी :
जुने पारगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शेरदिल ग्रुप यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या २० वर्षांपासून समाजहिताचे कार्य सातत्याने करणाऱ्या शेरदिल ग्रुप यांनी यंदाही पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी करत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एन. ए. पाटील यांच्या हस्ते मूर्ती पूजनाने करण्यात आली. यानंतर परिसरातील गुणवंत शिलेदारांचा सत्कार प्रा. डॉ. एन. ए. पाटील तसेच प्रा. सौ. वैशाली बुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल १०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच अशोकराव माने मेडिकल टीम यांच्या माध्यमातून आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा ४५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये ३५ नागरिकांच्या नवीन चष्म्यांच्या नंबरची नोंद करण्यात आली. “सरकार आपल्या दारी” अभियानांतर्गत अनेक नागरिकांच्या विविध समस्या तत्काळ मार्गी लावण्यात आल्या. शासकीय दाखले, अर्ज, विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित एसटी पास उपक्रमाचा तब्बल ४५७ नागरिकांनी लाभ घेतला. सन २००७ पासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेला शेरदिल ग्रुप हा केवळ एक ग्रुप नसून समाजासाठी कायम धावून येणारी ताकद बनला असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. “शेरदिल ग्रुप म्हणजे सेवा, विश्वास आणि समाजासाठी झटणारी युवा शक्ती,” अशा शब्दांत उपस्थितांनी ग्रुपचे कौतुक केले. गेल्या दोन दशकांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे शेरदिल ग्रुप यांनी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली असून लोकसेवेचा हा वारसा भविष्यातही अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अजून वाचा 👇 :
📰 पत्रकार बाबासाहेब जाधव यांना ‘निसर्ग सन्मान - राज्यस्तरीय पुरस्कार २०२६
📰 कोडोली येथे मातृदिनानिमित्त ‘Selfie with Mother' स्पर्धेचे आयोजन; आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा
📰 पन्हाळ्यातील नायब तहसीलदार संजय वळवी यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ पुरस्कार
📰 ABP शिक्षण समूह मध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा

0 Comments